35 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो OnePlus 11R, फोनमध्ये मिळू शकतो 16GB RAM + 512GB Storage

Highlights

  • OnePlus 11R India Price लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.
  • हा फोन 35,000 रुपयांच्या बेस किंमतीत भारतात लाँच केला जाऊ शकतो.
  • वनप्लस 11आर च्या सर्वात मोठ्या मॉडेलमध्ये 16GB RAM + 512GB Storage मिळू शकते.
  • हा फोन 7 फेब्रुवारीला OnePlus 11 सह भारतात लाँच होण्याची शक्यता.

OnePlus 11R संबंधित अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत ज्यात फोनच्या फोटोजपासून त्यांच्या स्पेसिफिकेशन्स पर्यंतची माहिती मिळाली आहे. तसेच आज एका नवीन बातमीमधून या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या लीकमध्ये OnePlus 11R India Price समोर आली आहे तसेच फोनच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंटची देखील माहिती देण्यात आली आहे. आशा आहे की हा वनप्लस मोबाइल 7 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येऊ शकतो.

OnePlus 11R Price

वनप्लस 11आरच्या किंमतीची माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. लीकमध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तसेच हा व्हेरिएंट 35 हजार ते 40 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो. OnePlus 11R 16GB + 512GB व्हेरिएंट भारतात 40,000 ते 45,000 रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Mahindra ची TATA ला भीती! XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत, रेंजही वाढवली

OnePlus 11R चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 FHD+ 120Hz AMOLED Screen
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Rear + 32MP Selfie Camera
  • 100W fast charging

वनप्लस 11आर बद्दल चर्चा आहे की हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फ्लॅगशिप फोन 16 जीबी रॅमसह बाजारात येईल ज्यात 512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. हा फोनचा सर्वात मोठा मॉडेल असेल तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळू शकते.

OnePlus 11R संबंधित लीकनुसार हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. हे देखील वाचा: Vivo नं लाँच केला ‘अस्सल’ 5G Phone! 11 बँडचा सपोर्ट आणि 8GB रॅमसह Y55s 5G लाँच

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11आर ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या वनप्लस फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here