शाओमी ने विकले 45 लाखांपेक्षा जास्त Redmi K20 आणि Redmi K20 Pro स्मार्टफोन

शाओमी ने काही दिवसांपूर्वी Redmi K30 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने यावेळी एक घोषणा केली कि Redmi K20 सीरीजने 45 लाखांपेक्षा जास्त यूनिटचा ग्लोबल शिपमेंट्सचा आकडा पार केला आहे. कंपनीच्या या सीरीजने लॉन्च नंतर फक्त 6 महिन्यांत हा नवीन रेकॉर्ड केला आहे. शाओमीची K20 सीरीज चीन मध्ये मे आणि भारतात जुलै मध्ये लॉन्च केला गेला होता.

Redmi K30 च्या लॉन्च इवेंट मध्ये शाओमीने घोषणा केली कि कंपनीने आपल्या Redmi K20 सीरीजचे 45 लाखांपेक्षा जास्त यूनिट्स शिपमेंट केले आहेत. Redmi K20 आणि Redmi K20 Pro दोन्ही डिवाइसेजची मार्केट परफॉर्मेंस चांगली होती आणि कमी किंमतीमुळे यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पेसिफिकेशन्स

दोन्ही फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह येतात, ज्यात 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.39-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हँडसेट्स स्क्रीन प्रोटेक्शन साठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो नवीन टेक्नोलॉजी सह येतो. Redmi K20 Pro नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणून स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे. तर Redmi K20 मिड-रेंड स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसर वर सादर केला गेला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi K20 Pro आणि Redmi K20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.4 अर्पचर वाली 13-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि त्याच अपर्चरची 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी दोन्ही फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सपोर्ट आहे.

Redmi K20 Pro 4जी फोन आहे जो डुअल सिमला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ, एनएफसी व यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी दोन्ही फोन मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. पण Redmi K20 Pro मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि Redmi K20 ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.

शाओमी रेडमी के20 प्रो वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here