Corona नंतर समोर आला Zombie Virus! 48000 वर्षांपासून होता बर्फाखाली, नवीन संकटाची चाहूल?

Zombie Virus: Corona Virus नं जवळपास दोन वर्षांपर्यंत संपूर्ण जगाला घरात राहण्यास भाग पाडलं होतं. COVID 19 मधील हाल लोक विसरले नाहीत, ज्यामुळे लाखो लोकांचा जीव गेला होता. परंतु आता यापेक्षाही मोठा धोका मानवजातीच्या समोर आला आहे. कारण 48 हजार वर्षांपासून ग्लेशियर खाली असलेला धोकादायक Zombie Virus पुन्हा पृष्ठभागावर आला आहे. हा झॉम्बी व्हायरस मानवतेसाठी धोकादायक आहे.

Zombie Virus

झॉम्बी व्हायरस हजारो वर्ष बर्फाखाली राहिल्यानंतर आता बाहेर आला आहे. युरोपियन शास्त्रज्ञांना रशियातील सायबेरिया भागातील पर्माफ्रॉस्टमधून काही नमुने मिळाले आहेत ज्याला Zombie Virus Siberian Permafrost असं म्हटलं जात आहे. वैज्ञानिकांनी हे पर्माफ्रॉस्ट परीक्षणासाठी पुनर्जीवित केले आहेत. वैज्ञानिकांनी याला ‘झॉम्बी व्हायरस’ असं नाव दिलं आहे. न्यूयार्क पोस्टनुसार जमलेल्या बर्फात अनेक हजार वर्ष राहिल्यानंतर देखील हा व्हायरस सांसर्गिक आहे आणि आता हे पुन्हा जिवंत झाल्यास अजून एका साथीच्या रोगाची शक्यता देखील उद्भवली आहे. हे देखील वाचा: Aadhar Card Download: आधार कार्ड डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या

zombie virus siberian permafrost revived

48,500 वर्षानंतर सक्रिय झाला धोकादायक व्हायरस

शास्त्रज्ञांनी शोधलेला हा झॉम्बी व्हायरस 48 हजार वर्षापेक्षा जास्त काळ ग्लेशियर्स खाली होता. विशेष म्हणजे हा व्हायरस मेळा नाही तर झोपला होता. ऋण तापमानामुळे हा पूर्णपणे मेळा नव्हता तसेच आता सायंटिस्टच्या अभ्यासातून समोर आलं आहे की हा व्हायरस पृष्ठभागावर आल्यास मानव, पशु-पक्षी आणि झाडांना लक्ष्य करू शकतो आणि तेव्हा विनाशकारी परिस्थिती उद्भवू शकते.

zombie virus siberian permafrost revived

ग्लेशियर वितळल्यास धोका वाढेल

प्रीप्रिंट रिपॉजिटरी बायोरेक्सिव्ह आर्टिकलनुसार हजारो वर्षांपासून गोठलेल्या ग्लेशियर्समध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू आहेत. जेव्हा हा बर्फ वितळेल तेव्हा व्हायरस व जीव वर येतील. ऊन आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळे हे व्हायरस पुन्हा अ‍ॅक्टिव्ह होऊ शकतात आणि वेगानं त्यांची वाढ होऊ शकते. अशाप्रकारे हे प्राचीन जीव व व्हायरस पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील आणि स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी काहीही करतील. हे देखील वाचा: OnePlus च्या तोडीचा Samsung फोन हवा? मग Galaxy M54 5G Phone साठी काही काळ थांबा

zombie virus siberian permafrost revived

संपूर्ण मानवजातीला संपवू शकतो व्हायरस

पर्माफ्रॉस्टला ग्लोबल वॉर्मिंगचा फायदा होत आहे. गोठलेल्या बर्फातून बाहेर आल्यानंतर कोकण्या व्हायरस किंवा जंतूला पसरण्यास किती वेळ लागेल, हे सांगणं कठीण आहे. परंतु यांचे संक्रमण वातावरण पसरू लागल्यास त्याला कसं रोखता येईल तसेच याच्या कचाट्यात मानव किंवा इतर पशु पक्षी आल्यास त्यावर काय उपाय करता येईल. या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप उपलब्ध झाली नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here