एआई कॅमेरा आणि मीडियाटेकच्या दमदार प्रोसेसर सह लॉन्च झाला एलजी के12+, बघा किंमत आणि फीचर्स

गेल्या महिन्यात एलजी ने मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 (एमडब्लूसी 2019) आधी आपला एलजी के40 सादर केला होता. आता कंपनी ने के सीरीज मध्ये आपला दुसरा स्मार्टफोन एलजी के12+ लॉन्च केला आहे. बोलले जात आहे कि हा नवीन मिड-रेंज फोन एलजी के40 चा नवीन वेरिएंट आहे. के12+ मध्ये कंपनी ने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) दिला आहे.

एलजी के12+ ची किंमत
कंपनी ने के 12+ स्मार्टफोन ब्राजील मध्ये लॉन्च केला आहे. एलजी के12+ ची किंमत पाहता हा 1,199 ब्राजीलियन रियल (जवळपास 21,200 रुपये) आहे. कंपनी ने डिवाइस तीन कलर वेरिएंट मध्ये आणला आहे. मोरक्कन ब्लू, प्लेटिनम ग्रे आणि ब्लॅक. वर सांगितल्याप्रमाणे गेल्या महिन्यात एलजी के40 समोर आला होता आणि एलजी के12+ याचाच नवीन वेरिएंट आहे. एलजी के12+ भारतीय मार्केट मध्ये लॉन्च होण्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

एलजी के12+ चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
फोन मध्ये 5.7-इंचाचा एचडी+ (720×1440 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा एस्पेक्ट रेशियो 18:9 आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी22 (एमटी6762) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 3जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. सोबतच माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने तुम्ही स्टोरेज 2टीबी पर्यंत वाढवू शकता.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये एलजी के12+ मध्ये 16-मेगापिक्सलचा रियर सेंसर आहे, ज्याचा अपर्चर एफ/2.0 आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश पण आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिविटी साठी फोन मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस आणि माइक्रो-यूएसबी पोर्ट आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये पवार बॅकअप साठी 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

अलीकडेच समोर आलेल्या बातमीनुसार एलजी आपला फोल्डेबल फोन आणण्याची तयारी करत आहे. याची माहिती काही पेटेंट मधून समोर आली आहे. यूनाइटेड स्टेट पेटेंट एंड ट्रेडमार्क ऑफिस मध्ये एका वेंडर ने हे पेंटेंट फाइल केले आहे.

USPTO’s वेबसाइट वर हा दिसला होता, ज्यात दाखवण्यात आले आहे कि डिवाइस सिंगल फोल्डेबल स्क्रीन सह येईल. सॅमसंग आणि हुआवई च्या फोल्डेबल फोन प्रमाणे एलजी च्या फोल्डेबल फोन मध्ये दोन स्क्रीन जोडण्यासाठी कोणताही कनेक्ट नसेल. एलजी पेटेंट मधून समजले आहे कि डिवाइस मध्ये सिंगल रियर कॅमेरा असेल. तसेच मागे सर्कुलर पोर्ट आहे जो फिंगरप्रिंट सेंसर साठी वापरला जाईल.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here