1,24,999 रुपयांचा हा अनोखा Motorola फोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या इतका महाग असण्याचे कारण

Motorola एक असा ब्रँड आहे जो इतर स्मार्टफोन कंपन्यांप्रमाणे डझनभर प्रोडक्ट्स लॉन्च करत नाही तर मर्यादित डिवाईसच बाजारात घेऊन येतो. मजबूत बिल्ट क्वॉलिटी आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले मोटोरोला फोन लोकांना आवडतात. आज भारतात आपल्या ताकद आणि टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत मोटोरोलाने शानदार Motorola razr 5G फोन भारतात सादर केला आहे. मोटोरोलाने हा फोन 1,24,999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला आहे.

Motorola razr 5G भारतीय बाजारात 1,24,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन इंडियन मार्केटच्या सर्वात महाग मोबाईल फोन्स पैकी एक बनला आहे. मोटोरोला रेजर 5जी आज म्हणजे 5 ऑक्टोबर पासूनच देशात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे तसेच फोनची विक्री येत्या 12 ऑक्टोबर पासून सुरु होईल. Moto razr 5G कंपनीच्या निवडक आउटलेट्स सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. या फोनची विक्री फक्त एकाच Polished Graphite कलर मध्ये होईल.

अनोखी डिजाईन

या मोटोरोला फोनची सर्वात मोठी खूबी याची अनोखी डिजाईन आहे. हा एक फोल्डेबल फोन आहे जो वरून खाली घडी होतो. मोटोरोला रेजर 5जी 3D ग्लास डिजाईन वर बनवण्यात आला आहे जो 7000सीरीज अल्युमिनियम बॉडी वर बनला आहे. फोन मधील दोन्ही डिस्प्ले जोडण्यासाठी सिंगल हिंज देण्यात आली आहे तसेच फोल्ड झाल्यावर रियर कॅमेरा खालच्या बाजूला फ्रंटला येतोआ णि कॅमेराच्या वर डिस्प्ले असतो. या स्क्रीन वर क्लॉक आणि नोटिफिकेशन दिसतात. या फोनची जाडी फक्त 6.9एमएम आहे. मोटोरोलाने आपला फोन वॉटर आणि डस्ट प्रूफ बनवला आहे.

दोन डिस्प्ले

Motorola razr 5G सिनेमाविजन 21:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2142 × 876 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.2 इंचाच्या ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हि स्क्रीन साईज फोन अनफोल्ड केल्यावर म्हणजे फोन उघडल्यावर मिळेल. त्याचप्रमाणे मोटो रेजर फोल्ड केल्यावर समोर येणाऱ्या स्क्रीनला सेकेंडरी डिस्प्ले म्हणतात. हा सेकेंडरी डिस्प्ले 4:3 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 600 × 800 पिक्सल रेज्ल्यूशन असेलल्या 2.7 इंचाच्या जीओएलईडी स्क्रीनला सपोर्ट करतो.

प्रोसेसिंग

मोटोरोला रेजर 5जी अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे. हा अँड्रॉइडचा स्टॉक वर्जन आहे त्यामुळे पुढील तीन वर्ष हा फोन प्रत्येक लेटेस्ट अँड्रॉइड वर सर्वात आधी अपडेट होईल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. Moto Razr भारतात 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. मोटोरोला रेजर 5जी रेडी फोन आहे जो भारतात 5जी नेटवर्क आल्यावर त्याचा वापर करेल.

कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Motorola razr 5G 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला गेला आहे. हा कॅमेरा सेंसर फोनच्या बाहेरच्या डिस्प्ले वर आहे जो रियर कॅमेऱ्याचे काम करतो. फोन फोल्ड केल्यावर हा कॅमेरा पुढे येतो. हा 48MP कॅमेरा सेंसर क्वॉड पिक्सल टेक्नोलॉजी सह येतो जो 4x low light sensitivity व Optical image stabilization सारख्या फीचर्स वर चालतो. हा फोन अनफोल्ड केल्यावर 20 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळेल जो डिस्प्लेच्या वरच्या बाजूला आहे.

कनेक्टिविटी आणि बॅटरी

Motorola razr 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 2,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या फोन मध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक, एनएफसी, ब्लूटूथ, वाईफाई आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतील.

विशेष म्हणजे Motorola razr 5G एचडीएफसी बॅंक कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास कंपनी थेट 10,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. तसेच फोन मध्ये Reliance JIO सिम वापरल्यास ग्राहकांना कंपनीकडून 14,997 रुपयांचे एक्स्ट्रा बेनिफिट मोफत दिले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here