100MP कॅमेरा असलेल्या realme 11 ची लाँच डेट ठरली; 31 जुलैला होईल जगभरात लाँच

Highlights

  • realme 11 31 जुलैला व्हिएतनाममध्ये लाँच होणार
  • व्हिएतनाममध्ये येणाऱ्या रियलमी 11 मध्ये 100 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
  • कंपनी रियलमी 11 लवकरच भारतात देखील लाँच करू शकते

रियलमीने गेल्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये जेव्हा भारतात रियलमी 11 प्रो 5जी सीरीज सादर केली होती तेव्हापासून ग्राहक Realme 11 ची वाट पाहत आहेत. आता ही प्रतीक्षा संपेल अशी चिन्ह आहेत कारण रियलमी 11 लवकरच भारतात येऊ शकतो. कारण हा मोबाइल फोन येत्या 31 जुलैला ग्लोबली लाँच होणार आहे. ग्लोबल लाँचनंतर हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येण्याची शक्यता वाढेल.

रियलमी 11 ग्लोबल लाँच

realme 11 31 जुलैला व्हिएतनाममध्ये लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. हा ग्लोबल लाँच भारतीय वेळेनुसार 31 जुलैला संध्याकाळी 4 वाजता व्हिएतनाम मध्ये आयोजित करण्यात आला आहे जो भारतात देखील लाइव्ह बघता येईल. आशा आहे की व्हिएतनाममध्ये सादर केल्यांनतर कंपनी रियलमी 11 लवकरच भारतात देखील लाँच करू शकते.

रियलमी 11 प्राइस (चीन)

हा रियलमी मोबाइल चीनमध्ये आधीची लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 256जीबी मेमोरीला सपोर्ट करतो. ह्याची किंमत RMB 1,599 आणि RMB 1,799 आहे जी भारतीय करंसीनुसार 19,000 रुपये आणि 21,400 रुपयांच्या आसपास आहे. फोनची ग्लोबल आणि इंडिया प्राइस ह्याच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

रियलमी 11 स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : चीनमध्ये हा स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. त्यावर 1000निट्झ ब्राइटनेस देखील मिळते.
  • प्रोसेसर : realme अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 4.0 वर सादर करण्यात आला आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसरसह चालतो. ग्राफिक्ससाठी ह्यात माली-जी57 जीपीयू आहे.
  • रॅम आणि स्टोरेज : रियलमीचा हा फोन 256 GB स्टोरेज असेलल्या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB रॅम सपोर्ट मिळतो. तसेच मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून युजर्स फोनची स्टोरेज वाढवू शकतात.
  • कॅमेरा : Realme 11 स्मार्टफोन चीनमध्ये 64 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेऱ्यासह लाँच झाला होता. परंतु व्हिएतनाममध्ये येणाऱ्या रियलमी 11 मध्ये 100 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सेल्फी कॅमेरा देखील 8एमपी ऐवजी 16एमपीचा असेल. म्हणजे कॅमेराच्या बाबतीत ग्लोबल मॉडेल चायना पेक्षा चांगला असेल.
  • बॅटरी : ह्या रियलमी स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. चीनमध्ये हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला होता, परंतु realme 11 ग्लोबल मॉडेलमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते.
  • कनेक्टिव्हिटी : या फोनमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स पाहता कंपनीनं 5G, 4G LTE, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here