108MP Camera असलेल्या realme C53 ची होणार भारतात एंट्री, तारीख समजली

Highlights

  • फोन 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाईल.
  • हा फोन येत्या 19 जुलैला भारतात लाँच होईल.
  • लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण केलं जाईल.

रियलमीने अलीकडेच नारजो 60 सीरिज सादर करून मिडरेंजमध्ये ग्राहकांना आकर्षित केलं होतं. तर आता कंपनी बजेट सेगमेंटकडे वळत आहे. कंपनीनं अधिकृतपणे ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन realme C53 ची घोषणा केली आहे. हा फोन येत्या 19 जुलैला भारतात लाँच होईल. लाँच डेटच्या घोषणेसोबतच सोबतच कंपनीनं खुलासा केला आहे की रियलमी सी53 108 मेगापिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

realme C53 इंडिया लाँच डिटेल

रियमलीनं सांगितलं आहे की पुढील आठवड्यात 19 जुलैला रियलमी सी53 स्मार्टफोन भारतात लाँच केला जाईल. त्या दिवशी दुपारी 12 वाजता फोन सादर केला जाईल. ह्या लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण ऑफिशियल वेबसाइटसह युट्युब चॅनेल आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलं जाईल.

realme C53 चा कॅमेरा

रियलमी इंडियानं सांगितलं आहे की त्यांचा नवीन मोबाइल फोन भारतीय बाजारात 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाईल. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जोडीला एलईडी फ्लॅश दिली जाईल. रियलमी सी53 स्मार्टफोनचा कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलॉजीसह काम करेल.

realme C53 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • स्क्रीन : रियलमी सी53 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिली जाऊ शकते. जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 560निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करू शकतो. ह्याची थिकनेस 7.49एमएम असू शकते.
  • प्रोसेसर : हा रियलमी फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआयवर लाँच होईल. ह्यात 1.82गीगाहर्ट्झ पर्यंतचा क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. आशा आहे की फोनमध्ये मीडियाटेक चिपसेट मिळेल.
  • रॅम : realme C53 कमीत कमी दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये भारतात लाँच होऊ शकतो. ह्यात 6जीबी रॅम दिली जाऊ शकतो. जोडीला 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी मिळू शकते.
  • बॅटरी : रियलमी सी53 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी कंपनी देऊ शकते. तसेच जोडीला 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ शकतो.
  • LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here