12 महीने चालणारा BSNL चा रिचार्ज, भरपूर डेटा आणि फ्री कॉलिंग

BSNL 12-month validity recharge: Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) नं आपल्या ग्राहकांना खुश करत Diwali Offer 2022 ची घोषणा केली आहे. या ऑफर अंतगर्त कंपनीनं दोन रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) सादर केले आहेत. कंपनीचे new plans – Rs 1198 आणि Rs 439 असे आहेत. दोन्ही प्लॅन दीर्घ वैधता, डेटा, कॉलिंग आणि फ्री SMS सह येतात. दिवाळी ऑफर अंतगर्त सादर केल्यामुळे हे प्लॅन संपूर्ण देशातील युजर्ससाठी सादर करण्यात आले आहेत. परंतु या सर्कलमध्ये बीएसएनएलची सर्व्हिस उपलब्ध नाही त्यांना हे रिचार्ज लागू होणार नाहीत. त्यामुळे जवळपास प्रत्येक ग्राहक हे रिचार्ज करू शकतील. या आर्टिकलमध्ये आपण Rs 1198 Recharge Plan बाबत माहिती घेणार आहोत.

BSNL Diwali Offer Recharge Plan

BSNL Rs 1198 Plan पाहता हा कंपनीचा एक नवीन रिचार्ज प्लॅन आहे जो दीर्घ वैधतेसह फ्री कॉलिंग मिनिट, डेटा आणि एसएमएसचे बेनिफिट देतो. जर तुम्ही बीएसएनएलचे युजर्स असाल आणि दीर्घ वैधता असलेले रिचार्ज शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल कारण यात संपूर्ण वर्षाची म्हणजे 365 दिवसांची वैधता मिळत आहे.

12 months च्या वैधतेसह BSNL Rs 1198 Plan मध्ये ग्राहकांना 3GB data, 300 minutes ची calling आणि 30 SMS per प्रति माह मिळतील. तसेच, दर महिन्याला मिळणारे बेनिफिट्स पुढील महिन्यात पुन्हा रिन्यू होऊन मिळू लागतील. हे देखील वाचा: अजून एक जबरदस्त दाक्षिणात्य चित्रपट येतोय OTT वर; Nagarjuna च्या ‘द घोस्ट’ ची रिलीज डेट समजली

रिचार्ज झाला लाइव्ह

या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 36GB डेटा, 3600 कॉलिंग मिनिट आणि 360 एसएमएसचा लाभ मिळेल. फक्त हे बेनिफिट्स 12 महिने वेगवेगळ्या भागांमध्ये वाटण्यात आले आहेत.कंपनीचा नवीन प्लॅन बीएसएनएल युजर्ससाठी रिचार्ज करण्यासाठी उपलब्ध आहेत. तुम्ही या नवीन प्लॅननं रिचार्ज करण्यासाठी बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता किंवा टेलिकॉम कंपनीचं सेल्फकेयर मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

BSNL Rs 439 Plan

बीएसएनएल 439 रुपयांचा प्लॅनमध्ये 90 दिवसांच्या वॅलिडिटी मिळते. तसेच कंपनीद्वारे या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग दिली जात आहे. हे कॉल 90 दिवस पूर्णपणे फ्री असतील तसेच बीएसएनएल ग्राहक कोणत्याही नंबरवर अमर्याद व्हॉइस कॉलिंग करू शकतील. कंपनीकडून या रिचार्ज प्लॅनमध्ये 300 एसएमएस देखील दिले जात आहेत. हे एसएमएस कोणत्याही डेली लिमिटविना येतात त्यामुळे यांचा वापर कधीही करता येतो. परंतु डेटा मात्र या प्लॅनमध्ये मिळत नाही. हे देखील वाचा: OnePlus च्या ‘या’ डिवाइसना मिळाला Jio 5G चा सुपर स्पीड; इथे पाहा सर्व फोन्सची लिस्ट

Note: बीएसएनएलचे संपूर्ण देशात वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळ्या बेनिफिट्ससह येतात. रिचार्ज करण्याआधी प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची कंपनीच्या साइट किंवा बीएसएनएल कस्टमर केयरकडून माहिती घ्यावी.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here