120.6 कोटी च्या पलीकडे गेली भारतीय टेलीकॉम यूजर्सची संख्या, आता टाकायचे आहे चीनला मागे

भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारा मोबाईल बाजार आहे. देशातील स्मार्टफोन यूजर्स ची वाढती संख्या आणि भारतात होणार्‍या इंटरनेट डाटा चा खप आपल्याला जगात अनेक देशांच्या पुढे ठेवतो. भारतात 4जी फोन च्या वाढत्या वापराने जगातील वेगवेगळ्या टेक कंपन्यांना देशात येण्यासाठी प्रेरित केले आहे. भारतात होणारा मोबाईल वापर मोजून भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (ट्राई) ने सांगितले की सध्या भारतात टेलीफोन यूजर्स 120 कोटी पेक्षा जास्त झाले आहेत.

ट्राई ने आपल्या रिपोर्ट मध्ये देशातील टेलीफोन यूजर्स चा आकडा शेयर केला आहे. ट्राई ने या आकड्यांमध्ये टेलीफोन यूजर्स ची संख्या सांगितली आहे, ज्यात स्मार्टफोन, फीचर फोन इत्यादि पण आहेत. ट्राई चा हा रिपोर्ट मार्च 2018 पर्यंतच्या मोजणी सह आहे आणि या मोजणी नुसार मार्च महिन्याच्या शेवटापर्यंत देशात टेलीफोन वापरणाऱ्यांची संख्या 120.6 पेक्षा पुढे गेली आहे.

ट्राई च्या आकड्यांनुसार फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी देशात एकूण 117.98 कोटी टेलीफोन यूजर्स मोजले गेले होते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतीय टेलीफोन यूजर्स मध्ये 2.24 टक्क्यांची वृद्धि झाली ज्यामुळे मार्च च्या शेवटी ही संख्या 120.6 कोटी पेक्षा पुढे गेली.

रिपोर्ट नुसार फेब्रुवारी महिन्यात 66.96 कोटी शहरी टेलीफोन यूजर्स होते जे मार्च मध्ये वाढून 68.16 कोटी झाले. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात 51.02 कोटी ग्रामीण यूजर फोन चा वापर करत होते आणि मार्च मध्ये यांची संख्या वाढून 52.46 कोटी झाली.

या आकड्यांनुसार वायरलेस श्रेणीत येणार्‍या जीएसएम, सीडीएमए आणि एलटीई मोबाईल फोन यूजर्स (स्मार्ट फोन + फीचर फोन) फेब्रुवारी मध्ये 115.68 कोटी होते जे 2.29 टक्क्यांनी वाढून मार्च पर्यंत 118.34 कोटी झाले. तर दुसरीकडे लँडलाईन फोन यूजर्स ची संख्या फेब्रुवारी मध्ये 229.7 लाख होती जी मार्च च्या शेवटी कमी होऊन 228.1 लाख झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here