200MP चा कॅमेरा! शाओमी-सॅमसंग नव्हे तर ‘ही’ कंपनी करणार कमाल; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक

Motorola नं यंदा Edge Series मध्ये आपले दोन फोन Edge 30 आणि Edge 30 Pro भारतीय बाजारात सादर केले आहेत. आता कंपनी या सीरीजमध्ये तिसरा मॉडेल सादर करण्याची तयारी करत आहे. याबाबत 91mobiles Hindi ला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. त्यानुसार आगामी Motorola Edge 30 Ultra स्मार्टफोन आधी आलेल्या Edge 30 Pro चा अपग्रेड मॉडेल असेल आणि या सीरीजचा सर्वात शक्तिशाली फोन असेल.

प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवनं फक्त Motorola Edge 30 Ultra च्या नावाची माहिती दिली नाही तर फोनच्या काही स्पेसिफिकेशनचा देखील खुलासा केला आहे. त्यानुसार, Motorola Edge 30 Ultra मध्ये तुम्हाला 6.67-इंचाचा डिस्प्ले आहे. कंपनी स्मार्टफोन 12GB रॅमसह 256GB मेमरी ऑप्शनमध्ये सादर करणार आहे. त्याचबरोबर फोनमध्ये Android 12 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. हा फोन व्हाईट आणि ग्रे रंगांसह सादर केला आहे. अन्य स्पेसिफिकेशनची माहिती मात्र मिळाली नाही.

Motorola Edge 30 Ultra चे स्पेसिफिकेशन

  • 6.67 इंच फुल एचडी+ AMOLED 144Hz डिस्प्ले
  • 12GB रॅम, 256GB मेमरी
  • व्हाईट आणि ग्रे
  • Android 12 ओएस
  • Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर
  • 4,500mAh बॅटरी, 125W फास्ट चार्जिंग
  • 200MP + 50MP + 12MP ट्रिपल कॅमेरा
  • 60MP सेल्फी कॅमेरा

Motorola Edge 30 Ultra चे आतापर्यंत काही लीक्स आले आहेत. काही दिवसांपूर्वी Motorola Frontier नावाचा एक फोन काही सर्टिफिकेशन साईटवर दिसला होता. हाच डिवाइस Motorola Edge 30 Ultra नावानं कंपनीनं बाजारात सादर करू शकते, अशी चर्चा आहे. हा फोन चिनी सर्टिफिकेशन साईट 3C वर लिस्ट झाला होता, त्यानुसार या फोनमध्ये 125 वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते, तसेच अन्य स्पेसिफिकेशन देखील खूप दमदार आहेत.

Motorola Edge 30 Ultra मध्ये तुम्हाला 4,500mAh जी बॅटरी मिळू शकते जी 125W चार्जिंगसह येईल. तसेच फोटोग्राफीसाठी 200MP च्या प्रायमरी लेन्ससह 50MP चा अल्ट्रावाईड आणि 12MP डेप्थ सेन्सर असू शकतो. तसेच या फोनमध्ये एज 30 प्रो प्रमाणेच 60MP चा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

नवीन लीकमध्ये स्क्रीन साइज बद्दल थोडा फर्ज दिसत आहे. 6.73-इंचाच्या स्क्रीनची माहिती मिळाली होती. अभिषेकनं दिलेल्या स्पेक्सनुसार फोनमध्ये 6.67 इंचाची स्क्रीन मिळू शकते. जुन्या लीकनुसार कंपनी AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर करू शकते आणि यात 144Hz रिफ्रेश रेटसह HDR 10+ सपोर्ट मिळू शकतो.

प्रोसेसर बाबत कोणताही खुलासा केला गेला नाही परंतु कंपनी हा हँडसेट Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर करू शकते, कारण हा फोन 2022 मधील कंपनीचा सर्वात शक्तिशाली फोन असेल आणि 8+ जेन 1 सध्या मोबाईल डिवाइससाठी सर्वात शक्तिशाली प्रोसेसर पैकी एक आहे. कंपनीचा Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन भारतात तसेच जगभरात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 सह येणारा पहिला फोन होता. त्यामुळे यावेळी देखील कंपनी शक्तिशाली प्रोसेसरची निवड करू शकते.

मोटोरोला ऐज 30 अल्ट्रा 5जी व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here