10 मिनिटांत बॅटरी फुल! बजेटमध्ये मिळणार सर्वात वेगवान चार्जिंग; भारतात येतोय जबरदस्त स्मार्टफोन

सध्या भारतीय बाजारात 150W फास्ट चार्जिंग असलेले दोन स्मार्टफोन उपलब्ध आहेत. रियलमी आणि वनप्लसचे हे डिवाइस सामान्य ग्राहकांच्या बजेटच्या बाहेर आहेत. परंतु आता Infinix भारतात 180W फास्ट चार्जिंग असेलला स्मार्टफोन सादर करणार आहे. याआधी देखील इनफिनिक्सच्या या फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनची माहिती समोर आली होती. आता एका नवीन रिपोर्टमध्ये इनफिनिक्सच्या आगामी Infinix Zero Ultra च्या संभाव्य किंमतीची माहिती मिळाली आहे. TechYorker च्या रिपोर्टनुसार, Infinix Zero Ultra स्मार्टफोन लवकरच भारतात 180W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. कंपनी हा चार्जर Thunder Charge (थंडर चार्ज) नावानं सादर करू शकते.

10 मिनिटांत फुल चार्ज

इनफिनिक्सच्या या आगामी स्मार्टफोनबद्दल अजूनतरी जास्त माहिती समोर आली नाही. कंपनीनं काही जुन्या टीजरमध्ये आगामी स्मार्टफोनची थोडीफार माहिती शेयर केली आहे. इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन 4,500mAh च्या बॅटरीसह सादर केला जाईल. कंपनीच्या दाव्यानुसार थंडर चार्जच्या मदतीनं ही बॅटरी फक्त 4 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते. हा फोन काही मिनिटांत फुल चार्ज होईल. कंपनीनं जरी सांगतील नसलं तर 10 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत हा फुल चार्ज होऊ शकतो. हे देखील वाचा: अर्ध्या तासात 80 टक्के चार्जिंग; 418km ची दमदार रेंज असलेली Electric SUV Car येतेय भारतात

किंमत किती असेल

इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन 8GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाईल. हा स्मार्टफोन फक्त 4G व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. रिपोर्ट्सनुसार Infinix Zero Ultra स्मार्टफोनमध्ये मागील जेनेरेशनचा प्रोसेसर देण्यात येईल. सध्या या फोनबद्दल जास्त माहिती समोर आली नाही. किंमतीबाबत आलेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन भारतात 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: घोडेस्वार Swiggy डिलिव्हरी बॉयला शोधा आणि मिळवा मोठं बक्षीस; कंपनीनं केली घोषणा

वनप्लस आणि पोकोला टक्कर

इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन अपर मिड रेंज सेग्मेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या प्राईस सेग्मेंटमध्ये हा डिवाइस OnePlus Nord 2T, iOOO Neo 6, आणि POCO F4 5G स्मार्टफोनला टक्कर देईल. इनफिनिक्सच्या या आगामी स्मार्टफोनचं सर्वात महत्वाचं फिचर याची फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल त्यामुळे वनप्लस आणि रियलमीच्या 150W फास्ट चार्जिंग असलेल्या हँडसेटच्या ऐवजी ग्राहक Infinix Zero Ultra स्मार्टफोनची निवड करतात की नाही ते पाहावं लागेल. Realme GT 2 Neo 3 आणि Oneplus 10R हे दोन स्मार्टफोन भारतात 150W फास्ट चार्जिंग स्पीडसह उपलब्ध आहेत. रियलमी स्मार्टफोनची किंमत 37 हजारांपासून सुरु होते, तर वनप्लसच्या फास्ट चार्जिंग स्मार्टफोनसाठी तुम्हाला 44 हजार रुपये मोजावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here