Infinix Zero 30 5G लवकरच होऊ शकतो लाँच; गीकबेंच, ब्लूटूथ एसआयजी साइटवर झाला लिस्ट

Highlights

 • Infinix नवीन 5G डिवाइस घेऊन येत आहे.
 • ह्यात Dimensity 8020 असू शकतो.
 • 8GB पर्यंत रॅम सपोर्ट दिला जाऊ शकतो.

Infinix सध्या आपल्या झिरो सीरीजचा विस्तार करत आहे. कंपनी Infinix Zero 20 स्मार्टफोनचा उत्तराधिकारी म्हणून एक नवीन 5G डिवाइस घेऊन येत आहे जो Infinix Zero 30 5G नावानं सादर केला जाऊ शकतो. नवीन मोबाइल सध्या गीकबेंच आणि ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशन साइटवर दिसला आहे. अंदाज लावला जात आहे की हा फोन येत्या जुलै महिन्यात सादर केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया लिस्टिंगची संपूर्ण माहिती.

Infinix Zero 30 5G ब्लूटूथ एसआयजी लिस्टिंग

लिस्टिंगनुसार इनफिनिक्सचा नवीन स्मार्टफोन X6731 मॉडेल नंबरसह दिसला आहे. जो बाजारात Infinix Zero 30 5G मार्केटिंग नावासह येऊ शकतो. ह्याआधी झिरो सीरीजमध्ये Zero 20 डिवाइस 4जी टेक्नॉलॉजीसह आला होता तर Zero 30 5G से येईल. तसेच डिवाइसमध्ये ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी दिली जाईल.

Infinix Zero 30 5G गीकबेंच लिस्टिंग

 • गीकबेंच लिस्टिंगनुसार Infinix Zero 30 5G डिवाइसमध्ये MediaTek MT6891Z/CZA प्रोसेसर असू शकतो. हा चिपसेट Dimensity 8020 असू शकतो.
 • लिस्टिंगमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम सपोर्टसह बाजारात येऊ शकतो.
 • ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन अँड्रॉइड 13 वर रन चालेल.
 • दोन्ही लिस्टिंगमध्ये सध्या इतकीची माहिती समोर आली आहे, परंतु काही दिवसांमध्ये आणखी माहिती येऊ शकते.

.

Infinix GT 10 Pro स्पेसिफिकेशन्स (लीक)

उपरोक्त दोन्ही स्मार्टफोनच्या लिस्टिंग व्यतिरिक्त इनफिनिक्स आपल्या नवीन GT सीरीजवर देखील काम करत आहे. असं सांगण्यात आलं आहे की जीटी सीरीज अंतगर्त Infinix GT 10 Pro बाजारात येऊ शकतो.

 • डिस्प्ले : लीकनुसार Infinix GT 10 Pro चा मॉडेल नंबर X6739 आहे. फोनमध्ये 6.8 इंचाचा अ‍ॅमोलेड एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि कर्व एज दिला जाईल.
 • प्रोसेसर : प्रोसेसर पाहता स्मार्टफोन Dimensity 9000 सह येऊ शकतो.
 • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 12जीबी पर्यंत रॅम + 256जीबी पर्यंत स्टोरेज सपोर्ट दिला जाऊ शकतो.
 • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 5000mAh बॅटरी आणि 260W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
 • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता ह्या फ्लॅगशिप डिवाइसमध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला जाईल.
 • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन अँड्रॉइड 13 आधारित XOS वर चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here