सॅमसंगनं जुलैमध्ये भारतीय बाजारात स्वस्त 5जी मोबाइल फोन Samsung Galaxy M13 5G लाँच केला होता. गॅलेक्सी ‘एम’ सीरीजमध्ये जोडण्यात आलेला हा स्मार्टफोन 50MP Camera, 6GB RAM, MediaTek Dimensity 700 चिपसेट आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो जो 13,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध झाला होता. परंतु आता सॅमसंग गॅलेक्सी एम13 5जी फोनवर कंपनीनं नवीन ऑफर सादर केली आहे ज्यामुळे Samsung Galaxy M13 5G फोन 2 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.
Samsung Phone Offer
सॅमसंग गॅलेक्सी एम13 5जी फोनवर कंपनीनं 2,000 रुपयांचा डिस्काउंट लागू केला आहे. ही ऑफर 30 नोव्हेंबर पर्यंत वैध असेल, या 12 दिवसांत ग्राहकांनी Samsung Galaxy M13 5G फोन विकत घेतला तर त्यांना कंपनीकडून थेट 2,000 रुपयांची सूट दिली जाईल. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एम13 स्मार्टफोन कोणत्याही मोबाइल शॉप किंवा रिटेल स्टोरवर देखील या डिस्काउंटसह विकला जाईल. आणि 2 हजार रुपयांचा हा डिस्काउंट फोनच्या सर्व व्हेरिएंट्सवर मिळेल. हे देखील वाचा: आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; देशात येतोय नवीन सरकारी नियम
Samsung Galaxy M13 5G Price
सॅमसंग गॅलेक्सी एम13 5जी फोनची किंमत पाहता हा स्मार्टफोन भारतीय बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी झाला उपलब्ध आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 13,999 रुपये आहे तर दुसरा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. परंतु सॅमसंग ऑफर अंतगर्त 2,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हे स्मार्टफोन व्हेरिएंट अनुक्रमे 11,999 रुपये आणि 13,999 रुपयांमध्ये विकले जातील. 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीमुळे हा 12जीबी रॅमची ताकद देऊ शकतो.
Samsung Galaxy M13 5G Specification
Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD तुलनेने छोटा डिस्प्ले देण्यात आला आहे,. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. जोडीला 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन Android 12 OS आधारित OneUI 4.0 वर चालतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. हे देखील वाचा: OTT Releases this Week: या आठवड्यात ओटीटीवर Godfather, Dharavi Bank सह पाहा साऊथचे हे जबरदस्त चित्रपट
सॅमसंगच्या स्वस्त 5G स्मार्टफोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. सोबतीला कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, 3.5mm ऑडियो आणि USB Type C पोर्ट असे ऑप्शन मिळतात.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.