बजेट फ्रेंडली Nokia C32 येत आहे भारतात, 23 मेला लाँच होईल हा स्वस्त मोबाइल फोन

Highlights

  • ह्यात 7GB RAM (4GB +3GB) मिळेल.
  • फोन 1 इयर रिप्लेसमेंट गॅरंटीसह विकला जाईल.
  • प्रारंभिक किंमत 9,999 रुपये असू शकते.

नोकियानं अलीकडेच 7,999 रुपयांचा Nokia C22 भारतीय बाजारात लाँच केला आहे. आता 91मोबाइल्सला बातमी मिळाली आहे की कंपनी ह्या ‘सी’ सीरीज अंतगर्त अजून एक नवीन स्मार्टफोन Nokia C32 देखील भारतीय बाजारात आणण्याची तयारी करत आहे जो येत्या 23 मेला लाँच केला जाईल. ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि अंदाजे किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

नोकिया सी32 प्राइस

सर्वप्रथम किंमत पाहता Nokia C32 एक लो बजेट डिवायस असेल जो कंपनी 12 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच करेल. सध्या प्राइसची पुख्ता माहिती तर मिळाली नाही परंतु अंदाज लावला जात आहे की नोकिया सी32 भारतात 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. ही फोनची प्रारंभिक किंमत असू शकते. विशेष म्हणजे हा नोकिया फोन 1 वर्षाच्या फ्री रिप्लेसमेंट गॅरंटीसह विकला जाईल.

नोकिया सी32 स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ display
  • 2.5D Cover glass

हा नोकिया फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्यात 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंच की एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी ह्याला 2.5डी ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आलं आहे. पाणी व धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी Nokia C32 IP52 सर्टिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे.

  • 4GB RAM + 3GB RAM
  • Unisoc SC9863A SoC

Nokia C32 अँड्रॉइड 13 वर सादर केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. हा नोकिया फोन 3जीबी वचुर्अल रॅमला देखील सपोर्ट करेल जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून ह्याला 7जीबी रॅमची पावर देईल.

  • 50MP rear camera
  • 8MP selfie sensor

फोटोग्राफीसाठी नोकिया सी32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल जो 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह येईल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

  • 10W 5,000mAh battery

पावर बॅकअपसाठी Nokia C32 स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करेल जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. ह्या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्सही मिळतील. तसेच सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ह्याच्या साइड पॅनलवर दिला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here