Realme GT 3 बाजारात लाँच, 240W फास्ट चार्जिंगनं मिनिटांत होतो चार्ज

Highlights

  • Realme GT 3 फोन 16GB रॅमसह लाँच झाला आहे.
  • हा सुमारे 10 मिनिटांत फुल चार्ज होतो.
  • डिवाइसमध्ये Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट आहे.

Realme नं आपला 240 वॉट फास्ट चार्जिंग पावर असलेला स्मार्टफोन Realme GT 3 स्मार्टफोन रशियन मार्केटमध्ये आणला आहे. याआधी हा डिवाइस फेब्रुवारी मध्ये मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2023 दरम्यान चीनमध्ये सादर करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा मोबाइल सुमारे 10 मिनिटांत फुल चार्ज होतो. चला जाणून घेऊया ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती.

Realme GT 3 ची किंमत

कंपनीनं Realme GT 3 रशियन बाजारात सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये आला आहे. ज्यात 16GB रॅम +1TB स्टोरेजचा समावेश आहे. डिवाइसची किंमत RUB 69,990 म्हणजे सुमारे 68,000 रुपये आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर realme च्या रशियन वेबसाइट आणि डीएनएस, mvideo, ozon सारख्या काही रिटेल स्टोर्सवर विक्री सुरु होईल.

Realme GT 3 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: Realme GT 3 मध्ये 6.74-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 2772 x 1240 चे पिक्सल रिजॉल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, 10-बिट कलर, 5,000,000:1 चा कॉन्ट्रास्ट रेश्यो, 93.69 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि 100 टक्के DCI-P3 कलर गमट सपोर्ट मिळतो.
  • प्रोसेसर: 240W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या ह्या डिवाइसमध्ये Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 16GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळते.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 4600 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 240W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीचा दावा आहे की ह्या चार्जिंग स्पीडनं फोन 9.5 मिनिटांत फूल चार्ज होऊ शकतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता Realme GT 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा लेन्स OIS सपोर्टसह येते. ह्या लेन्ससह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रोस्कोप लेन्स मिळते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा Samsung S5K3P9SP04 फ्रंट कॅमेरा आहे.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित Realme UI 4.0 वर चालतो.
  • सुरक्षा: सुरक्षेसाठी मोबाइलमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स मिळतात.
  • अन्य: इतर फीचर्स पाहता डिवाइसमध्ये ड्युअल सिम, 5G, ब्लूटूथ, वायफाय, C शेप एलईडी फ्लॅश आहे जो नोटिफिकेशन मिळाल्यावर वेगवेगळ्या कलर्समध्ये चमकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here