32MP Selfie आणि 50MP Back Camera असलेला फोन फक्त 9999 रुपयांमध्ये मिळेल 16GB RAM ची ताकद

कमी बजेटमध्ये चांगला कॅमेरा असलेला फोन पाहत आहात तर Infinix Hot 40i तुम्हाला कामी येऊ शकतो. हा स्वस्त स्मार्टफोन या आठवड्यात (फेब्रुवारी, 2024) मध्ये भारतात लाँच झाला आहे जो 32MP Selfie Camera आणि 50MP Rear Camera ला सपोर्ट करतो. इनफिनिक्स हॉट 40 आई ची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा पण कमी आहे. पुढे आम्ही या स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती शेअर केली आहे जी वाचून तुम्ही मोबाईल बाबत माहिती जाणून घेता येईल.

Infinix Hot 40i किंमत

इनफिनिक्स हॉट 40आई भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या मोबाइलमध्ये 8GB RAM + 256GB Storage देण्यात आली आहे ज्याचा रेट 9,999 रुपये आहे. ऑफलाइन रिटेल स्टोर्स तसेच ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर या स्वस्त स्मार्टफोनला Palm Blue, Starfall Green, Horizon Gold आणि Starlit Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Infinix Hot 40i कॅमेरा

फ्रंट कॅमेरा

  • 32MP AI Selfie Camera
  • LED Flash
  • Portrait Mode, Ultra HD Mode, SuperNight Mode

आजच्या युगामध्ये सेल्फी क्लिक करण्यासाठी तसेच रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकण्याचा ट्रेंड आहे. इनफिनिक्स हॉट 40 आई या ट्रेंडला फॉलो करणाऱ्या लोकांसाठी चांगली सुविधा देतो. या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशसह चालतो. या कॅमेरा लेन्स सोबतच फोनमध्ये अनेक मोड्स तसेच फिल्टर्स पण मिळतात जो सेल्फीला आणि पण जबरदस्त बनवितात.
बॅक कॅमेरा

  • 50MP Dual AI Camera
  • Quad LED Ring Flash
  • Pro Camera Mode, Short Video Mode, Super Night Mode

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 40 आई ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनच्या बॅक पॅनलवर एलइडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे ज्यासोबत सेकंडरी लेन्स आहे. हा रिअर कॅमेरा सेटअप 12 पेक्षा अधिक मोडला सपोर्ट करतो जो फोटोग्राफीला खास बनवितो.

Infinix Hot 40i स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन

  • 6.6” HD+ (720 × 1612)
  • 90Hz Refresh Rate
  • Punch-Hole Display

इनफिनिक्स हॉट 40आई स्मार्टफोन 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे. ही एचडी+ स्क्रीन आहे जी पंच-होल स्टाइलवर बनली आहे. ही मोबाइल स्क्रीन 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. तसेच यावर मॅजिक रिंग फिचर पण मिळते.

परफॉर्मन्स

  • UniSOC T606 (1.6GHz)
  • Android 13 + XOS 13.5
  • Mali-G57 GPU

हा इनफिनिक्स स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो एक्सओएस 13 सह मिळून चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइलमध्ये यूनिसोक टी606 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 1.6 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली–जी57 जीपीयू आहे.
मेमरी

  • 8GB Virtual RAM
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 2TB SD Card Slot

इनफिनिक्स हॉट 40आई 8जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8 जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी पण आहे. ही टेक्नॉलॉजी फोनच्या फिजिकल रॅमसह मिळून याला 16 जीबी रॅमची ताकद देते. स्टोरेज पाहता फोनमध्ये 256 जीबी इंटरनल मेमरी आहे तसेच यात 2 टीबीचे मेमरी कार्ड पण लावले जाऊ शकते.

बॅटरी

  • 5,000mAh Battery
  • 18W Fast Charging
  • Reverse Charging

पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 40 आई स्मार्टफोन 5,000 एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. या मोठ्या बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाइलमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा मोबाइल रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो, फोनमुळे तुम्ही तुमचे इअरबड्स किंवा स्मार्टवॉचला चार्ज करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here