नवीन 5G Phone घेताय? मग हे 10 पॉईंट कायम ठेवा लक्षात

सध्या स्मार्टफोन घेताना सर्वप्रथम हाच विचार येतो की तो फोन 5G असावा. परंतु फक्त 5G आहे म्हणून कोणताही फोन घेणं योग्य नाही. कारण सध्या बाजारात बजेट सेगमेंटमध्ये देखील 5जी फोन आले आहेत आणि प्रत्येक कंपनी बेस्ट 5G एक्सपीरियंसचा दावा देखील करत आहे परंतु यातील बेस्ट 5जी फोन कोणता हा महत्वाचा प्रश्न आहे. आज इथे आम्ही तुम्हाला 5जी फोनची लिस्ट दिली नाही परंतु 10 पॉईंट्स सांगितले आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही योग्य 5G स्मार्टफोनची निवड करू शकता.

10 पॉईंट: कसा असावा तुमचा 5G स्मार्टफोन

  • जास्तीत जास्त 5जी बँडचा सपोर्ट
  • प्रोसेसर फॅब्रिकेशन
  • हीट डिस्पेशन सिस्टम
  • UFS मेमरी
  • 8GB रॅम असावा
  • मोठी बॅटरी
  • हाय रिजोल्यूशन स्क्रीन
  • 90 किंवा 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट
  • फास्ट चार्जिंग
  • डॉल्बी इंटीग्रेशन

जास्तीत जास्त 5जी बँडचा सपोर्ट

भारतात 5G सर्व्हिसची घोषणा जियो, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियानं केली आहे. Jio आणि Airtel ची 5G सर्व्हिस अनेक शहरांमध्ये सुरु झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार उसनुसार एयरटेलकडे 5G सर्व्हिससाठी 900 MHz (n8), 1800 MHz (n3), 2100 MHz (n1), 3300 MHz (n78) आणि 26 GHz (n258) बँड आहेत. तसेच कंपनी 5G सर्व्हिससाठी एन8 आणि एन3 बँडचा वापर करत आहे. Jio 5G bands पाहता कंपनीकडे 700 MHz (n28), 3300 MHz (n78) व्यतिरिक्त 26 GHz (n58) बँड आहे आणि कंपनी एन28 आणि एन78 बँडचा मोठ्याप्रमाणावर वापर करत आहे. राहिला प्रश्न वोडाफोन-आयडियाचा तर कंपनीकडे 5Gसाठी 3300 MHz (n78) आणि 26 GHz (n258) स्पेक्ट्रम बँड उपलब्ध आहेत. भारतात तुम्हाला 5G सर्व्हिस याच बँड्सवर मिळेल. तुम्ही 5जी फोन घेण्याचा विचार करत असाल तर या बँड्सचा सपोर्ट त्यात आहे की नाही ते पाहा. शक्य असल्यास ज्यात जास्ती जास्त 5G बँडचा सपोर्ट असेल असाच फोन घ्या. एक-दोन 5G बँड असलेल्या फोन्स पासून दूर राहिलेले चांगले.

प्रोसेसर फॅब्रिकेशन

आतापर्यंत त्या फोनची निवड करायला सांगितली जायची ज्याच्या प्रोसेसरचा स्पीड जास्त असेल. परंतु स्मार्टफोनमधील टेक्नॉलॉजी बदलत आहे त्यामुळे त्या फोनची निवड करावी ज्याच्या प्रोसेसरचं फॅब्रिकेशन सर्वात बेस्ट असेल. सध्या बाजारात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशन प्रोसेसवर तयार झालेल्या प्रोसेसरसह फोन येत आहेत जर तुम्ही त्यांची निवड केली तर बेस्ट आहे परंतु ते महाग वाटत असतील तर निदान 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेला 5जी फोन घ्यावा. चांगल्या फॅब्रिकेशनचा फरक तुम्हाला हीटिंग, बॅटरी ऑप्टिमाइजेशनसह परफॉर्मन्समधून दिसेल.

हीट डिस्पेशन सिस्टम

साहजिक आहे तुम्ही 5जी फोन घेण्याचा विचार करत असाल तर त्यावर इंटरनेट ब्राउजिंग सोबतच ऑनलाइन गेमिंग आणि हेव्ही अ‍ॅप्सचा वापर कराल. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये हीट डिस्पेशन आणि व्हेपर कूलिंग चेंबर सारखे फीचर्स आवश्यक आहेत. त्यामुळे इंटरनेट वापरताना किंवा ऑनलाइन गेमिंग दरम्यान जर प्रोसेसर गरम झाल्यास हीट डिस्पेशन आणि व्हेपर कूलिंग चेंबरसारखे फीचर्स तापमान संतुलित करतात आणि फोनची परफॉर्मन्स कायम ठेवतात.

UFS मेमरी

तुम्हाला माहित आहे की फोनमध्ये फास्ट डेटा ट्रांसफरसाठी जितका चांगला प्रोसेसर आणि रॅम टेक्नॉलॉजी लागते तेवढीच महत्वाची फ्लॅश मेमरी म्हणजे इंटरनल मेमरी टेक्नॉलॉजी देखील आहे. जर तुमच्या फोनच्या मेमरीमध्ये यूएफएसचा सपोर्ट असेल तर उत्तम. सध्या बाजारात 4.0 यूएफएसचे फोन आहेत परंतु जर तुम्ही 3.0 किंवा 3.1 यूएफएस टेक्नॉलजीचे फोन घेतले तरी चालेल.

8GB रॅम असावा

जर तुम्हाला तुमचा 5G फोन दीर्घकाळ नीट वापरायचा असेल तर कमीत कमी 8GB रॅम असेलेल्या 5जी फोनची निवड करा. कारण 5जी फोनमध्ये फास्ट नेटवर्क स्पीड प्रोसेस करण्यासाठी जास्त मेमरीचा वापर होतो त्यामुळे 4GB आणि 6GB सह तुम्हाला काही दिवसांनी समस्या येऊ शकते. त्यामुळे कमीत कमी 8GB रॅम असलेल्या फोनची निवड करा. तसेच शक्य असल्यास रॅम टेक्नॉलॉजी DDR5 असेल तर उत्तम.

मोठी बॅटरी

5जी फोनमध्ये बॅटरी वेगानं संपते, हे तुम्हाला कदाचित माहित असेल. त्यामुळे माझ्यामते कमीत कमी 4500mAh पेक्षा जास्त बॅटरी असलेला फोन घ्या. जर 5000mAh पेक्षा जास्त बॅटरी असेल तर अतिउत्तम. हे देखील वाचा: दगडासारखा दणकट फोन! Doogee S100 मध्ये 10800mAh बॅटरी आणि 12GB रॅम

हाय रिजोल्यूशन स्क्रीन

5G सर्व्हिस फास्ट नेटवर्क आहे आणि या नेटवर्कचा वापर तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम, अभ्यास किंवा इंटरटेनमेंटसाठी करता. त्यामुळे तुमचा फोन हाय रिजोल्यूशनचा असेल तर फास्ट इंटरनेटचा वापर करताना मजा येईल. त्यामुळे मोठी स्क्रीनसह हाय रिजोल्यूशन पिक्सलकडे देखील लक्ष असू द्या. तसेच अ‍ॅमोलेड किंवा ओएलईडी स्क्रीन पॅनल असेल तर एकच नंबर.

90 किंवा 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट

जर तुम्ही 5जी फोन घेत असाल तर कमीत कमी 90 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेट असलेला फोन निवडा. तसेच यापेक्षा जास्त 120 किंवा 144 हर्ट्जचा रिफ्रेश रेट असेल तर बेस्टच. म्हणजे फास्ट स्क्रॉलिंगमध्ये तुम्ही अडकणार नाही.

फास्ट चार्जिंग

हा एक महत्वाचा पॉईंट आहे जो बऱ्याचदा मिस होतो. कारण 5जी फोनमध्ये बॅटरी खूप वेगानं संपते. इंटरनेट किंवा ऑनलाइन गेमिंगमध्ये कधी संपेल ते तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे फास्ट चार्जिंग आवश्यक आहे. जर 44 वॉट किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बेस्ट. हे देखील वाचा: Vivo V27 Pro Price in India: लाँचपूर्वीच समोर आली माहिती, इतकी असेल किंमत

डॉल्बी इंटीग्रेशन

तुम्हाला तर माहित असेलच की डॉल्बी आपल्या साउंड टेक्नॉलॉजीसाठी ओळखली जाते. त्यामु जर तुम्ही 5जी फोनचा विचार करत असाल आणि मोठा डिस्प्ले आणि सुपर फास्ट इंटरनेट असेल तर टेक्नॉलॉजीवर देखील लक्ष द्या. खास करून जर तुम्ही फोन इंटरटेनमेंट किंवा गेमिंगसाठी घेत असाल तर डॉल्बी इंटीग्रेशन नक्की पाहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here