28 फेब्रुवारीला लॉन्च होतील सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन हॅन्डसेट

काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने माहिती दिली होती कि ते लवकरच ए सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च करणार आहे. आतापर्यंत कंपनी ने आपल्या एम आणि एस सीरीज मध्ये हॅन्डसेट लॉन्च केले आहेत. लीक मधून मिळालेल्या बातमीनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए20 कंपनी सर्वात आधी लॉन्च करेल. काही दिवसांपूर्वी आम्ही सॅमसंग गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए20 ची एक्सक्लूसिव माहिती दिली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार गॅलेक्सी ए सीरीज 28 फेब्रुवारीला लॉन्च केली जाईल.

याची माहिती सॅम मोबाईल द्वारा समोर आली आहे. सॅमसंग मेंबर्स ऍप मधील एका नोटिफिकेशन मधून असे समोर आले आहे कि भारतात सॅमसंग गॅलेक्सी ए-सीरीज 28 फेब्रुवारी 2019 ला समोर येईल मेंबर्स ऍप बऱ्याचदा नवीन सॉफ्टवेयर अपडेट आणि लेटेस्ट ऑफर्सच्या नोटिफिकेशन देतो, पण आता ऍप मधील एका नोटिफिकेशन वरून गॅलेक्सी ए-सीरीजच्या भारतीय लॉन्चची तारीख समजली आहे.

4 मार्चला लॉन्च होईल रियलमी 3, शाओमीला मिळेल टक्कर

मेंबर्स ऍप मधील नोटिफिकेशन मध्ये एक गोष्ट विशेष लक्ष देण्यालायक आहे ती म्हणजे कंपनी कोलकत्ता, हैदराबाद आणि मुंबई मध्ये इवेंटचे आयोजन करेल. कंपनी मेंबर्स ऍपच्या यूजर्सना आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी नोंदवण्यास सांगत आहे जेणेकरून त्यांच्या शहरातील लॉन्च इवेंटसाठी इनवाइट त्यांना मिळावे.

काही दिवसांपूर्वी रिपोर्ट आला होता कि मार्च पासून जून पर्यंत सॅमसंग प्रत्येक महिन्याला एक नवीन गॅलेक्सी ए-सीरीजचा स्मार्टफोन आणेल. तर काही रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए-सीरीज अंतर्गत गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 येतील.

बघा सॅमसंग गॅलेक्सी एस10, एस10+ आणि एस10ई ची भारतातील किंमत, आहेत का आयफोन पेक्षा महाग

अशा आहे कि नवीन मॉडेल इनफिनिटी-वी आणि इनफिनिटी-यू डिस्प्ले पॅनल सह येतील. अलीकडेच आलेल्या रिपोर्ट नुसार गॅलेक्सी ए50 मध्ये 6.14—इंचाची सुपर एमोलेड स्क्रीन मिळू शकते. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन फुल एचडी प्लस असेल आणि कंपनी हा 19:9 आसपेक्ट रेशियो सह सादर करू शकते. तसेच आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार हा पण कंपनी वी शेप इनफिनिटी सह सादर होईल जो सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये आहे.

याव्यतिरिक्त 91मोबाईल्सला सॅमसंग गॅलेक्सी ए20 च्या डिजाइन बद्दल अजून काही माहिती मिळाली होती. जसे कि या फोन मध्ये दोन सिम सोबत एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात येईल. तसेच गॅलेक्सी एम20 आणि एम10 प्रमाणे गॅलेक्सी ए20 मध्ये पण तुम्हाला वी शेप नॉच मिळेल. तसेच बातमीनुसार कंपनीची ए सीरीज ऑफलाइन स्टोर साठी असू शकते. अलीकडेच लॉन्च सॅमसंग गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 कंपनी ने ऑनलाइन स्टोर मध्ये सादर केले होते पण गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन फोन ऑफलाइन स्टोर मध्ये येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here