Airtel ने आणला 40GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल असलेला पोस्टपेड प्लान, Jio Postpaid Plus ला देईल आव्हान

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

Bharti Airtel अनेक दिवसांपासून आपल्या प्रीपेड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन प्लान सादर करत आहे. तसेच यावेळी कंपनीने प्रीपेड सह पोस्टपेड ग्राहकांना खुश करत पुन्हा एकदा आपला 399 रुपयांचा पोस्टपेड प्लान लॉन्च केला आहे. यावेळी एयरटेलच्या 399 रुपयांचा प्लान जास्त टेलिकॉम सर्कलसाठी सादर केला गेला आहे. याआधी कंपनीने आपल्या लिस्टिंग मधून हा प्लान काढला होता आणि निवडक सर्कल मधेच हा ऑफर केला जात होता. पण जियोच्या पोस्टपेड प्लानला टक्कर देण्यासाठी कंपनीने पुन्हा एकदा 399 रुपयांचा प्लान सर्व सर्कल मध्ये सादर केला आहे.

Jio च्या विपरीत, Airtel ग्राहकांना 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लान सह एक अतिरिक्त कनेक्शन जोडण्याचा पर्याय देत नाही. एयरटेलने सांगितले आहे कि फक्त 499 रुपये आणि त्यापेक्षा जास्तीच्या पोस्टपेड प्लान मधेच ‘Priority Service’ मिळू शकते, याचा अर्थ असा कि 399 रुपयांचा प्लानचा वापर करणाऱ्या ग्राहकांना कोणतीही विशेष प्राथमिकता असलेली सेवा मिळणार नाही.

Airtel च्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल सह 40GB 3G / 4G डेटा आणि रोज 100 एसएमएस दिले जात आहेत. यात Airtel Xstream प्रीमियम, Wynk Music आणि Shaw Academy चे सब्सक्रिप्शन पण मिळते. एयरटेल फ्री हेलोट्यून्स आणि सोबत फस्टॅग वर 150 रुपयांचा कॅशबॅक देत आहे.

399 रुपयांच्या पोस्टपेड प्लानला जियोच्या 399 रुपयांच्या प्लानकडून टक्कर मिळेल. दोन्ही प्लान्स मध्ये मिळणारे फायदे जवळपास सारखेच आहेत. 399 रुपयांच्या Jio पोस्टपेड प्लस प्लान मध्ये 75GB 4G हाई-स्पीड डाटा, अनलिमिटेड कॉल आणि एसएमएस आणि 200GB डेटा रोलओवर मिळतो. तसेच Airtel प्रमाणे Jio आपल्या ग्राहकांना Disney + Hotstar VIP, Netflix, Prime Videos आणि Jio मेंबरशिप मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here