लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला Infinix Hot 30i, 27 मार्चला होणार भारतात एंट्री

Infinix Hot 11
Highlights

  • Infinix Hot 30i गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे.
  • हा स्मार्टफोन 27 मार्चला भारतात लाँच केला जाईल.
  • लिस्टिंगमध्ये 4GB RAM आणि Spreadtrum चिपसेटचा खुलासा.

Infinix Hot 30i 27 मार्चला भारतात लाँच होईल. कंपनीनं हा मोबाइल फोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच आता हा स्मार्टफोन गुगल प्ले कसोंलवर लिस्ट झाला आहे, ज्यामुळे बाजारात येण्यापूर्वीच इनफिनिक्स हॉट 30आयच्या अनेक महत्वाच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

इनफिनिक्स फोनची लिस्टिंग

इनफिनिक्स हॉट 30आय गुगल प्ले कंसोलवर Infinix-X669 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. इथे फोन 4जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. हा फोनचा बेस व्हेरिएंट असू शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Spreadtrum T606 चिपसेट असल्याचा खुलासा देखील या लिस्टिंगमध्ये झाला आहे. हे देखील वाचा: 260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा

गुगल प्ले कंसोल नुसार 2 x ARM Cortex-A75 आणि 6 x ARM Cortex-A55 असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जोडीला ग्राफिक्ससाठी एआरएम माली जी57 जीपीयू मिळू शकतो. लिस्टिंगमध्ये हा फोन अँड्रॉइड 12 ओएससह दाखवण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 720 X 1612 पिक्सल रिजोल्यूशनसह वॉटरड्रॉप नॉच असेलेला डिस्प्ले दिसत आहे जो 320डीपीआयला सपोर्ट करू शकतो.

इनफिनिक्स हॉट 30आयचे स्पेसिफिकेशन्स

वरील लिस्टिंगमध्ये समोर आलेल्या माहिती व्यतिरिक्त कंपनीनं ऑफिशियली टीज केलं आहे की Infinix Hot 30i स्मार्टफोन 16जीबी रॅमसह बाजारात येईल. यात 8जीबी इंटरनल रॅम आणि 8जीबी वचुर्अल रॅमचा समावेश असेल. तसेच फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचं देखील समोर आलं आहे. हे देखील वाचा: सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जीची डिजाइन लागली आमच्या हाती, कलर ऑप्शन्सही समजले

लीक्स पाहता Infinix Hot 30i मध्ये 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले दिली जाऊ शकते जो आयपीएस एलसीडी पॅनलवर असून 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर असल्याचं देखील समोर आलं. लीकनुसार हा फोन 6,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here