116 कोटींचा भारत! Reliance Jio, Airtel, BSNL आणि Vodafone Idea, बघा कोणत्या कंपनीचे झाले किती ग्राहक

भारतात सध्या 1.16 बिलियन म्हणजे 116 कोटींपेक्षा पण जास्त मोबाईल यूजर्स आहेत. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारा मोबाईल बाजार आहे. Reliance Jio च्या एंट्री नंतर देशातील टेलीकॉम बाजारात भरपूर वाढ झालेली दिसत आहे याविषयी दुमत असू शकत नाही आणि इंटरनेट डेटा आणि वॉयस कॉलिंगच्या किंमती कमी झाल्या आहेत. देशातील टेलीकॉम इंडस्ट्री वर नजर ठेवणाऱ्या ट्राई ने पण आपल्या नवीन रिपोर्ट मध्ये हे सिद्ध केले आहे कि Jio चा उपभोक्ता आधार वेगाने वाढत आहे तर Airtel आणि Vodafone Idea सारख्या कंपन्यांच्या नेटवर्क वर तेवढ्याच वेगाने हि यूजर्सची संख्या कमी होत आहे.

टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI ने आपल्या नवीन रिपोर्ट मध्ये एप्रिल 2019 चे टेलीकॉम आकडे शेयर केले आहेत. या आकड्यांवरून समजले आहे कि वर्षाची दुसरी तिमाही सुरु होताच Reliance Jio ने आपल्या नेटवर्कशी नवीन यूजर्स जोडत नवीन रेकॉर्ड केला आहे तर Bharti Airtel आणि Vodafone Idea ने लाखो कस्टमर्स गमावले आहेत. या रिपोर्ट नुसार सरकारी कपंनी BSNL ने पण एप्रिल महिन्यात सकारात्मक प्रभाव दाखवत 2 लाखांपेक्षा जास्त नवीन ग्राहक आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत.

अशी आहे टेलीकॉम बाजाराची स्थिती

Reliance Jio बद्दल सर्वात आधी बोलायचे तर ट्राई नुसार एप्रिल 2019 मध्ये कंपनी ने 80 लाखांपेक्षा जास्त नवीन ग्राहक जोडले आहेत. रिपोर्ट नुसार मार्च मध्ये जियो कडे 30 कोटी 67 लाख यूजर्स होते ते एप्रिलच्या शेवटी वाढून 31 कोटी 48 लाख झाले.

Bharti Airtel कडे मार्च मध्ये 32 कोटी 51 लाखांपेक्षा जास्त कस्टमर्स होते. पण एप्रिलच्या शेवटी जवळपास 32 लाख लोकांनी एयरटेलची सोबत सोडली ज्यामुळे एप्रिल 2019 मध्ये एयरटेल नेटवर्क वर 32 कोटी 18लाखांच्या आसपास यूजर्स उरले आहेत.

Vodafone Idea बद्दल बोलायचे तर या कंपनीने पण एप्रिल महिन्यात 15 लाखांपेक्षा जास्त यूजर्स गमावले आहेत. मार्च मध्ये वोडाफोन आइडियाचा उपभोक्ता आधार 39 कोटी 48 लाख होता तोच एप्रिल मध्ये कमी होऊन 39 कोटी 32 लाख झाला आहे.

BSNL ने एयरटेल आणि वोडाफोन आइडिया पेक्षा चांगली वाढ दाखवत 2 लाखांपेक्षा जास्त नवीन यूजर्स आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत. एप्रिल 2019 च्या शेववाटपर्यंत बीएसएनएल चा एकूण उपभोक्ता आधार 11 कोटी 58 लाख पेक्षा जास्त आहे.

116 कोटी मोबाईल यूजर

सर्व टेलीकॉम कंपन्यांचे आकडे मिळून बोलायचे झाले तर ट्राई च्या आकड्यांनुसार मार्च 2019 पासून एप्रिल 2019 पर्यंत भारतीय टेलीकॉम बाजारात 4 लाख 86 हजार 707 यूजर्सची वाढ झाली आहे. मार्च मध्ये भारतात एकूण ऍक्टिव्ह टेलीकॉम यूजर 116 कोटी 18 लाख 11 हजार 569 होते ते एप्रिलच्या शेवटपर्यंत 116 कोटी 22 लाख 98 हजार 276 झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here