50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Highlights

  • Vivo Y27 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • फोन डायमेन्सिटी 6020 SoC वर चालतो.
  • स्मार्टफोनमध्ये 6.64-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

Vivo Y27 5G अखेरीस कंपनीनं अधिकृतपणे सादर केला आहे. हा फोन कंपनीनं आपल्या ग्लबोल वेबसाइटवर सर्व स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट केला आहे. ह्यात फोनची खासियत पाहता ह्यात 15 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 एसओसी आहे. पुढे तुम्हाला ह्या डिवाइसच्या सेल, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती मिळेल.

Vivo Y27 5G ची किंमत, कलर आणि उपलब्धता

  • सध्या Vivo Y27 5G ची किंमत मात्र समोर आली नाही.
  • किंमतची माहिती दिल्यांनतरच कंपनी विक्रीची घोषणा करेल.
  • Vivo Y27 5G Mystic Black आणि Satin Purple कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

Vivo Y27 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Vivo Y27 5G मध्ये 2388 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 6.64-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन वॉटर-ड्रॉप-शेप नॉच डिजाइनसह येतो.
  • प्रोसेसर : फोनमध्ये मीडियाटेक ऑक्टा-कोर 6nm डायमेन्सिटी 6020 एसओसी देण्यात आली आहे.
  • रॅम व स्टोरेज : Vivo Y27 5G 4GB/6GB रॅम व्हेरिएंटसह 128GB इंटरनल स्टोरेज देतो. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. त्याचबरोबर फोनमध्ये 6जीबी व्हर्च्युअल रॅम आहे.
  • कॅमेरा : फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्या सेटअपमध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP चा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP चा सेन्सर आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : फोनला पावर देण्यासाठी 15वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • ओएस : Y27 5G फनटच ऑपरेटिंग सिस्टम 13 आधारित अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • अन्य : कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड स्लॉट, 5G SA/NSA, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, ब्लूटूथ v5.1, जीपीएस, एफएम रेडिया इत्यादी ऑप्शन आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी साइड माउंटेडट फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here