50MP आणि 33W फास्ट चार्जिंगसह आला Infinix Note 12i फोन

Highlights

  • Infinix Note 12i 9,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे.
  • Jio Exclusive Program अंतगर्त 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
  • Expandable RAM टेक्नॉलॉजी द्वारे हा फोन 7GB RAM वर परफॉर्म करू शकतो.
  • Mediatek Helio G85 processor आणि 50MP Camera याची खासियत आहे.

इनफिनिक्सनं आज भारतीय बाजारात आपला नवा लो बजेट स्मार्टफोन Infinix Note 12i सादर केला आहे. हा मोबाइल फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे जो 50MP Camera, 4GB RAM, Mediatek Helio G85 चिपसेट, 33W super charging आणि 5,000mAh battery ला सपोर्ट करतो. पुढे या फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, किंमत व ऑफर्सची माहिती देण्यात आली आहे.

Infinix Note 12i Price

इनफिनिक्स नोट 12आय स्मार्टफोन सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या फोनमध्ये 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस 9,999 रुपये आहे. Infinix Note 12i ची विक्री 30 जानेवारीपासून सुरु होईल तसेच हा मोबाइल फोन Force Black, Metaverse Blue आणि Alpine White कलरमध्ये विकत घेता येईल. Jio Exclusive Program अंतगर्त इनफिनिक्स नोट 12आयवर My Jio App मध्ये 1,000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. हे देखील वाचा: एकही रुपया न देता पाहा भुवन बामची वेब सीरिज; आयुष्मानचा अ‍ॅक्शनपट देखील येतोय या आठवड्यात

Infinix Note 12i Specifications

  • 6.7” FHD+ AMOLED display
  • 50MP triple rear camera
  • 4GB + 3GB = 7GB RAM
  • Mediatek Helio G85
  • 33W 5,000mAh battery

इनफिनिक्स नोट 12आय स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या लार्ज फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोन डिस्प्लेसह 1000निट्स ब्राइटनेस, 100000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि आय केयर मोड सारखे फीचर्स मिळतात. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 नं प्रोटेक्ट करण्यात आलं आहे.

Infinix Note 12i अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एआरएम माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन 3जीबी एक्सपांडेबल रॅमसह येतो जो इंटरनल रॅमसह मिळून 7जीबी रॅमची पावर देतो. चांगल्या गेमिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 3D 6-लेयर Graphene Cooling System आणि DarLink 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स नोट 12आय ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.6 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि एक वीजीए लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो ड्युअल एलईडीसह येतो. हे देखील वाचा: महागड्या OnePlus 11 5G सह येणार परवडणारा OnePlus 11R; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाले दोन्ही फोन

Infinix Note 12i 4G फोन आहे ज्यात ड्युअल सिमचा वापर करता येतो. सिक्योरिटीसाठी हा मोबाइल फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here