14 हजारांत आला OPPO A58 4G! मिळते 50MP Camera आणि 12GB RAM ची ताकद

Highlights

  • फोन इंडोनेशिया मध्ये लाँच झाला आहे.
  • हा 6जीबी वचुर्अल रॅमसह येतो.
  • ह्यात 33W SUPERVOOC चार्जिंग मिळते.

ओप्पोनं ग्लोबल मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन OPPO A58 4G लाँच केला आहे. हा ओप्पो मोबाइल इंडोनेशियन बाजारात आला आहे जो 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरच्या पावरसह येतो. ओप्पो ए58 4जी फोनच्या इंडिया लाँचची माहिती मिळाली नाही परंतु ह्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO A58 4G चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले : ओप्पो ए58 4जी फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.72 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 550निट्स ब्राइटनेस तसेच 391पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी 7 बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स आहे. तसेच ओप्पो ए58 4जी फोन 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : OPPO A58 4G अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 सह लाँच झाला आहे. ह्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी ह्यात माली जी52 जीपीयू आहे.
  • रॅम : ओप्पोनं आपल्या नवीन स्मार्टफोनला 6जीबी रॅमची ताकद दिली आहे. ह्यात फोनमध्ये 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे जी फिजिकल 6जीबी रॅमसह 12जीबी रॅमची ताकद देते.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या ओप्पो मोबाइलमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 33वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • अन्य फीचर्स : ओप्पो ए58 4जी फोनमध्ये ड्युअल सिम सोबतच Wi-Fi 5, Bluetooth 5.3, USB Type-C, 3.5mm Jack, NFC आणि IPX4 रेटिंग सारखे फीचर्स मिळतात.

OPPO A58 4G प्राइस

इंडोनेशियामध्ये ओप्पो ए58 4जी फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे जो 6जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ह्या फोनची किंमत IDR 2,500,000 आहे जी भारतीय करंसीनुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीनं आपला नवीन स्मार्टफोन Shining Black आणि Luminous Green कलरमध्ये बाजारात आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here