50MP Camera आणि 8GB RAM सह OPPO A78 4G ची एंट्री, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

 • हा फोन इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे.
 • ओप्पो मोबाइल 67W SUPERVOOCला सपोर्ट करतो.
 • हा 8जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह आला आहे.

मोबाइल ब्रँड ओप्पोनं आपल्या ‘ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन OPPO A78 4G टेक मंचावर सादर केला आहे. हा 4जी फोन इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे जो 8GB RAM आणि Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह येतो. ओप्पो ए78 4जी ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO A78 4G ची किंमत

नवीन ओप्पो मोबाइल सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे. ह्यात 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत IDR 3,599,000 आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 19,500 रुपयांच्या आसपास आहे. इंडोनेशियामध्ये ओप्पो ए78 4जी फोन Sea Green आणि Black Mist कलरमध्ये विकत घेता येईल.

OPPO A78 4G स्पेसिफिकेशन्स

 • 6.43″ 90Hz AMOLED display
 • Qualcomm Snapdragon 680
 • 8GB RAM + 256GB Storage
 • 50MP Dual Rear Camera
 • 67W SUPERVOOC Charging
 • 5,000mAh Battery
 • स्क्रीन : ओप्पो ए78 4जी फोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.43 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. ओप्पोनं आपला फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे जो गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्टेड आहे.
 • प्रोसेसर : OPPO A78 4G अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर लाँच झाला आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा फोन 8जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह येतो जो 8जीबी फिजिकल रॅमसह मिळून 16जीबी रॅमची ताकद देतो.
 • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा ओप्पो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ओप्पो ए78 4जी 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
 • बॅटरी : पावर बॅकअपसाठी OPPO A78 4G फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा ओप्पो मोबाइल 67वॉट सुपरवूक टेक्नॉलॉजीसह आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here