50MP Camera आणि 5,000mAh Battery लो बजेट स्मार्टफोन Moto G04s झाला जागतिक बाजारात लाँच

Motorola ने एक नवीन लो बजेट मोबाईल फोन Moto G04s टेक मंचावर सादर केला आहे. हा स्मार्टफोन जर्मनीमध्ये आणला गेला आहे जो 4GB RAM, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशनला सपोर्ट करतो. फोनचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto G04s चे स्पेसिफिकेशन

  • 6.56″ HD+ 90Hz Display
  • 50MP Back Camera
  • 4GB virtual RAM
  • Unisoc T606 processor
  • 4GB RAM + 64GB Storage
  • 15W 5,000mAh battery

डिस्प्ले : मोटो जी 04 एस 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ स्क्रीनवर लाँच झाला आहे. हा पंच-होल स्टाईल डिस्प्ले आहे जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. स्क्रीनला गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्ट करण्यात आले आहे.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Moto G04s च्या बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅनल्सवर सिंगल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. रिअर कॅमेरा पाहता हा एलइडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सल सेन्सर आहे. तसेच सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

परफॉर्मन्स : मोटो जी 04 एस स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आधारित माययूएक्सवर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात यूनिसोक टी 606 ऑक्टाकोर प्रोसेसर ​आहे जो 1.6 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

मेमरी : Moto G04s 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. या फोनमध्ये 4 जीबी वचुर्अल रॅम पण देण्यात आली आहे जो मोबाईलला फिजिकल रॅमसह मिळून याला 8 जीबी रॅमची ताकद प्रदान करतो. मोबाईलमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे ज्याला मायक्रोएसडी कार्डने वाढवले पण जाऊ शकते.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी मोटोरोला स्मार्टफोन मोटो जी04 एसमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. या मोठ्या बॅटरी सोबतच फोनमध्ये 15 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण आहे.

इतर फिचर्स : मोटो जी 04 एस water-repellent डिझाईनवर बनला आहे. यात NFC, 3.5mm jack, Bluetooth 5.0, 4G VoLTE, dual SIM आणि Dolby Atmos speaker पण देण्यात आले आहेत.

Moto G04s ची किंमत

मोटोरोलाने जी 04 एसला Concord Black, Sea Green, Satin Blue आणि Sunrise Orange सारख्या 4 कलर ऑप्शन्समध्ये सादर केले आहे. कंपनीकडून सध्या याच्या किंमतीची माहिती देण्यात आलेली नाही परंतु अपेक्षा करू शकता की हा मोबाईल 10 हजाराच्या किंमतीमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here