सॅमसंगनं लाँच केला Dimensity 700 प्रोसेसरसह Galaxy A14 5G फोन

सॅमसंग संबंधित एक बातमी अनेक दिवसांपासून येत होती की कंपनी गॅलेक्सी ‘ए’ सीरीजच्या नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे जो Samsung Galaxy A14 5G नावानं लाँच होईल. आता या कोरियन ब्रँडनं आपला हा नवीन मोबाइल फोन गुपचूप मार्केटमध्ये सादर केला आहे. गॅलेक्सी ए14 5जी फोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे जो 4GB RAM, MediaTek Dimensity 700, 50MP camera आणि 5,000mAh battery ला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A14 5G Price

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन सर्वप्रथम अमेरिकन बाजारात आला आहे जिथे याची किंमत 200 डॉलर ठेवण्यात आली आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 16,000 रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे भारतात हा मोबाइल फोन जवळपास 14 हजरांच्या रेंजमध्ये येऊ शकतो. यूएस मार्केटमध्ये या सॅमसंग फोननं Black, Light Green, Dark Red आणि Silver कलरमध्ये एंट्री घेतली आहे. हे देखील वाचा: चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे

Samsung Galaxy A14 5G Specifications

  • 6.6″ FHD+ 90Hz डिस्प्ले
  • 4GB RAM + 64GB storage
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Dual Rear Camera
  • 15W 5,000mAh battery

फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 1080 x 2408 रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसहवर लाँच झाला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 204 ग्राम आहे.

Samsung Galaxy A14 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो वनयुआय 5 सह चालतो. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा सॅमसंग मोबाइल 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी ए14 5जी फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: छप्परफाड डील! 16 हजारांच्या रेंजमध्ये 60MP Selfie कॅमेरा असलेला फोन; जोडीला 13GB रॅमची ताकद

Samsung Galaxy A14 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 4जी देखील वापरता येतं. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच स्मार्टफोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा सॅमसंग मोबाइल फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here