8GB RAM सह Samsung Galaxy A23 5G भारतात लाँच

Highlights

  • Samsung Galaxy A23 5G आणि A14 5G भारतात लाँच
  • RAM Plus सह 16GB RAM ची परफॉर्मन्स
  • फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 चिपसेट
  • 50MP क्वॉड कॅमेरा आणि 5,000mAh ची Battery

Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G फोन आज भारतात लाँच झाले आहेत. गॅलेक्सी ए14 5जी कंपनीनं Exynos 1330 प्रोसेसरसह बाजारात आणला आहे. तसेच गॅलेक्सी ए23 5जी Qualcomm Snapdragon 695 वर लाँच झाला आहे जो 16GB RAM च्या शक्तीसह परफॉर्म करू शकतो. पुढे आम्ही या पावरफुल सॅमसंग 5जी मोबाइल फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. गॅलेक्सी ए14 5जी डिटेल्स तुम्ही (इथे क्लिक करून) वाचू शकता.

Samsung Galaxy A23 5G ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन को भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB RAM + 128GB storage देण्यात आली आहे. तर मोठा व्हेरिएंट 8GB RAM + 128GB storage ला सपोर्ट करतो. प्राइस पाहता 6जीबी रॅम 22,999 रुपये तर 8जीबी रॅम 24,999 रुपयांमध्ये भारतात लाँच केला गेला आहे. हा 5जी सॅमसंग फोन देशात Silver, Light Blue आणि Orange कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची वाट लावण्यासाठी सॅमसंगचा डाव; अत्यंत कमी किंमतीत Galaxy A14 5G फोन भारतात लाँच

Samsung Galaxy A23 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6” HD+ 120Hz डिस्प्ले
  • 8GB RAM + 128GB storage
  • Qualcomm Snapdragon 695
  • 50MP Quad रियर कॅमेरा
  • 25W 5000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले आहे जो पीएलएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. या गॅलेक्सी फोनचे डायमेंशन 165.4 x 76.9 x 8.4एमएम आणि वजन 197ग्राम आहे.

Samsung Galaxy A23 5G अँड्रॉइड आधारित वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन रॅम प्लस फीचरसह आला आहे. ज्यामुळे फोनची इंटरनल रॅममध्ये 8जीबी पर्यंतचा अतिरिक्त वचुर्अल रॅम जोडता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर आहे. हे देखील वाचा: पुन्हा घडणार शांतीत क्रांती; मराठी वेब सीरिज दुसऱ्या सीजनच्या शूटिंगचे काहीच दिवस शिल्लक

ड्युअल सिम सपोर्टेड या सॅमसंग फोनमध्ये 5जी व 4जी दोन्ही वापरता येतं. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबतच हा स्मार्टफोन पावर बॅकअपसाठी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A23 5G फोन 3.5एमएम जॅक व डॉल्बी अ‍ॅटमॉस सारख्या फीचर्ससह बाजारात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here