Samsung Galaxy A14 5G भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच

Highlights

  • Samsung Galaxy A14 5G फोन 16,499 रुपयांमध्ये भारतात लाँच
  • फोनमध्ये 8GB RAM सह Exynos 1330 चिपसेट
  • सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी मध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 2 वर्ष ओएस अपग्रेड आणि 4 वर्ष सिक्योरिटी अपडेट

Samsung Galaxy A14 5G Launch: सॅमसंगनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन 5जी फोन लाँच केले आहेत. यातील एक Samsung Galaxy A14 5G आहे आणि दुसऱ्याचं नाव Samsung Galaxy A23 5G आहे. यातील गॅलेक्सी ए14 5जी सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 8GB RAM, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. पुढे आम्ही या 5जी मोबाइल फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमतीची संपूर्ण माहिती दिली आहे.

Samsung Galaxy A14 5G Price

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची प्राइस 16,499 रुपये आहे. तसेच फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मॉडेल 18,999 रुपयांमध्ये तसेच सर्वात मोठा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मॉडेल 20,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन Dark Red, Light Green आणि Black कलरमध्ये 18 जानेवारी पासून विकत घेता येईल. हे देखील वाचा: 16GB RAM सह दमदार OPPO A78 5G भारतात लाँच; किंमत आहे खिशाला परवडणारी

Samsung Galaxy A14 5G Specifications

  • 6.6” FHD+ 90Hz Display
  • 50MP Triple Rear camera
  • 8GB RAM + 128GB storage
  • Samsung Exynos 1330

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन पीएलएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. फोन स्क्रीन सह 16एम कलर सारखे फीचर्स देखील मिळतात. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 210 ग्राम आहे.

Samsung Galaxy A14 5G अँड्रॉइड ओएस आधारित वनयुआयसह लाँच करण्यात आला आहे ज्यात 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर एक्सनॉस 1330 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा सॅमसंग फोन रॅम प्लस फीचरसह येतो ज्यात गरजेनुसार वचुर्अल रॅम वाढवता येतो. गॅलेक्सी ए14 5जीची एक खासियत म्हणजे फोन 2 वर्षांच्या ओएस अपग्रेड आणि 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह येतो.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सर आणि तेवढ्याच अपर्चरच्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: जबरदस्त! इलेक्ट्रिक अवतारातील Honda Activa लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात

Samsung Galaxy A14 5G ड्युअल सिम फोन आहे ज्यात 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्ज नंतर नॉर्मल वापर केल्यास हा फोन 2 दिवस सहज चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here