6,000mAh Battery आणि 80W Fast Charging सह iQOO Z7x लाँच, पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • iQOO Z7x चायना मध्ये लाँच झाला आहे.
  • यात 120W Fast Charging देण्यात आली आहे.
  • हा फोन Snapdragon 695 वर चालतो.

आयकूनं काही दिवसांपूर्वीच आपल्या होम मार्केट चीनमध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर असलेला iQOO Z7i लाँच केला होता. आता कंपनीनं या सीरीज iQOO Z7 आणि iQOO Z7x स्मार्टफोन देखील आणले आहेत. हे दोन्ही फोन देखील सध्या चायनामध्ये आले आहेत ज्यात आयकू झेड7एक्सच्या प्राइस, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. 6,000mAh Battery आणि 80W Fast Charging याची मुख्य खूबी आहे.

आयकू झेड7एक्सची किंमत

iQOO Z7x चीनमध्ये तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. दुसरा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच सर्वात मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या तिन्ही व्हेरिएंट्सची किंमत क्रमश: 1299 युआन, 1399 युआन आणि 1499 युआन आहे जी इंडियन करंसीनुसार क्रमश: 15,600 रुपये, 16,800 रुपये आणि 18,000 रुपयांच्या आसपास आहे. हे देखील वाचा: 64MP Camera सह भारतात आला Realme C55, पाहा फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

आयकू झेड7एक्स चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.64″ FHD+ 120Hz Display
  • Qualcomm Snapdragon 695
  • 8GB RAM + 256GB storage
  • 50MP Triple Rear Camera
  • 80W Fast Charging
  • 6,000mAh Battery

आयकू झेड7एक्स 2388 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.64 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. फोन डिस्प्ले पंच-होल स्टाईलवर बनला आहे जो 480निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

iQOO Z7x अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो ओरिजनओएस 3 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 619 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आयकू झेड7एक्स च्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.0 अपर्चर असेलेल्या 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here