64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 5G प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो Vivo V29 Pro

Highlights

  • Vivo V29 सीरीज लवकरच होऊ शकते लाँच
  • मीडियाटेकच्या प्रोसेसरसह येऊ शकतात फोन
  • यात 64MP चा प्रायमरी आणि 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो

विवो भारतात लवकरच आपल्या लोकप्रिय व्ही सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोन सीरीज V29 संबंधित लीक रिपोर्ट्स समोर आला आहे. आता टिपस्टर पारस गुगलानीनं आगामी Vivo V29 Pro 5G स्मार्टफोनचे एक्सक्लूसिव्ह लीक स्पेसिफिकेशन्स 91मोबाइल्स सोबत शेयर केले आहेत.

Vivo V29 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

डिस्प्ले आणि डिजाइन

  • 6.7 इंच AMOLED कर्व्ड डिस्प्ले
  • इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर

टिपस्टर पारस गुगलानीला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह एंट्री करू शकतो. त्याचबरोबर डिस्प्ले पॅनलच्या दोन्ही कडा कर्व असू शकतात. या फोनच्या बॅक पॅनलमध्ये कलर चेंजिंग पॅनल दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: 18 एप्रिलला लाँच होईल Xiaomi 13 Ultra; ग्लोबल लाँचची खुद्द कंपनीनं दिली माहिती

प्रोसेसर, रॅम-स्टोरेज आणि ओएस

  • Dimensity 8000 सीरीज 5G प्रोसेसर
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज

प्रोसेसर पाहता विवोच्या लोकप्रिय स्मार्टफोन सीरीजचा आगामी फोन मीडियाटेकच्या प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. हा फोन Mediatek Dimensity 8000 सीरीजच्या 5G प्रोसेसरसह येऊ शकतो. लीक स्पेक्स मध्ये दावा करण्यात आला आहे की हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह एंट्री करेल. विवोचा हा फोन अँड्रॉइड 13 वर चालेल.

कॅमेरा

  • 64MP प्रायमरी कॅमेरा
  • 50MP फ्रंट कॅमेरा

फोटोग्राफी बद्दल टिपस्टरनं दावा केला आहे की विवोच्या आगामी Vivo V29 Pro स्मार्टफोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा असेल, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजर (OIS) फिचरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर या फोनमध्ये सेल्फीसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: विवोची शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज येतेय भारतात; कंपनीनं केली Vivo X90 सीरीजची घोषणा

बॅटरी आणि चार्जिंग

  • 5000mAh बॅटरी
  • 66W फास्ट चार्ज

आगामी Vivo V29 Pro स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळू शकते. त्याचबरोबर या फोनमध्ये 66W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. विवोच्या आगामी फोनबद्दल सध्या इतकीच माहिती उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here