
Vivo X90 सीरीज स्मार्टफोनबद्दल अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत आहे. ही ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झालेली विवोची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज आहे. अलीकडेच एका रिपोर्टमधून समोर आलं होतं की 26 एप्रिलला Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. कंपनीनं याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. दरम्यान आता विवो इंडियाच्या सोशल मीडिया हँडलवर एक्स90 सीरीज टीज होण्यास सुरुवात झाली आहे. यावरून स्पष्ट झालं आहे की हे फोन्स लवकरच भारतीय बाजारात येणार आहेत.
विवो एक्स90 सीरीजचा टीजर व्हिडीओ
The beauty of imagination is that it can turn the ordinary into something extraordinary.
Now it’s your turn to bring your imagination to life.#vivoX90Series revealing soon.To know more, visit https://t.co/W8bj8LfX81#XtremeImagination #ComingSoon pic.twitter.com/Sgdvc2JJL2
— vivo India (@Vivo_India) April 12, 2023
विवो एक्स 90 चा टीजर व्हिडीओ वर पाहता येईल. व्हिडीओच्या शेवटी ‘कमिंग सून’ लिहिण्यात आलं आहे. तसेच कंपनीनं आपल्या वेबसाइटवर या फोन्ससाठी एक मायक्रोसाइट बनवली आहे. यात फोनच्या फोटोजसह काही खास फीचर्सची माहितीही देण्यात आली आहे.
Vivo X90 आणि X90 Pro ची किंमत (संभाव्य)
किंमत पाहता Vivo X90 स्मार्टफोन ग्लोबली MYR 3,699 (जवळपास 70,000 रुपये) तर Vivo X90 Pro मॉडेल MYR 4,999 (जवळपास 95,000 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला होता. भारतात देखील या फोन्सची किंमत देखील इतकीच असू शकते.
Vivo X90 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स (ग्लोबली)
- 6.78″ FHD+ OLED display
- 12GB RAM + 256GB storage
- MediaTek Dimensity 9200
- 32MP Selfie Camera
- 120W Fast Charging
विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाले आहेत. ही Q9 Ultra-Vision AMOLED पॅनल स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. दोन्ही स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतात तसेच 1300निट्स ब्राइटनेस व 2160हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारख्या फीचर्सना सपोर्ट करतात.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 9200 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. अँड्रॉइड 13 सह एक्स90 मध्ये फनटचओएस 13 देण्यात आला आहे तर एक्स90 प्रो ओरिजनओएस 3 वर चालतो. हे विवो स्मार्टफोन 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 storage ला सपोर्ट करतात.
Vivo X90 आणि X90 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. रियर कॅमेरा सेटअप पाहता एक्स90 मध्ये 50MP IMX866 प्रायमरी सेन्सरसह 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. तर एक्स90 प्रो 50MP IMX989 सेन्सरसह 12MP IMX663 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP IMX758 पोर्टरेट लेन्सला सपोर्ट करतो.
दोन्ही विवो स्मार्टफोन 5G SA/ NSA आणि Dual 4G VoLTE ला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी Vivo X90 मध्ये 4,810एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर Vivo X90 Pro स्मार्टफोन 4,870एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. दोन्ही मोबाइल फोन्स 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतात तसेच कंपनीनं आपला प्रो मॉडेल 50वॉट वायरलेस चार्जिंगसह सादर केला आहे.
















