वनप्लस लवकरच फोल्डेबल फोन सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. कंपनीचा OnePlus Open फोल्डेबल फोन पुढील महिन्यात येणार असल्याची बातमी आली आहे. त्याचबरोबर कंपनी ‘एस’ सीरिजचा OnePlus Ace 2 Pro देखील बाजारात आणू शकते. ह्या फोनमध्ये 24GB RAM + 1TB Storage सह पावरफुल Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल. वनप्लस एस 2 प्रोची नवीन लीक माहिती पुढे वाचता येईल.
OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स (लीक)
स्क्रीन : वनप्लस एस 2 प्रो मध्ये 6.74 इंचाची मोठी स्क्रीन दिली जाऊ शकते जी 1.5के रिजोल्यूशनवर चालेल. लीकनुसार हा डिस्प्ले ओएलईडी पॅनलवर बनलेला असू शकतो ज्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट देखील दिला जाऊ शकतो.
प्रोसेसर : OnePlus Ace 2 Pro संबंधित नवीन लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो.
रॅम : टिपस्टर नुसार हा वनप्लस फोन 24जीबी रॅमसह लाँच होईल. ह्यात फिजिकल रॅम किती आणि वचुर्अल रॅम किती ते समजलं नाही. आशा आहे की हा फोन 16GB RAM + 8GB RAMला सपोर्ट करेल.
स्टोरेज : जास्त रॅम सोबतच फोनमध्ये मोठी इंटरनल स्टोरेज देखील मिळेल. लीकमध्ये समोर आलं आहे की वनप्लस एस 2 प्रो मध्ये 1टीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स890 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या अन्य लेन्स मिळतील. तसेच फोनमध्ये 16एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या वनप्लस फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळू शकते.
चार्जिंग : मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी OnePlus Ace 2 Pro 150वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकतो.
OnePlus Ace 2 Pro लाँच (अंदाज)
वनप्लस एस 2 प्रो पुढील महिन्यात बाजारात येऊ शकतो, अशी चर्चा आहे. कंपनीनं सांगितलं नाही परंतु 29 ऑगस्टला वनप्लसचा फोल्डेबल मोबाइल OnePlus Open चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे OnePlus Ace 2 Pro देखील 29 ऑगस्टला लाँच होण्याची शक्यता आहे.