8,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 6GB रॅम असलेला Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन उपलब्ध

8000 Discount On Realme Narzo 50 Pro 5g Amazon Deal

भारतात 5G चा शुभारंभ झाल्यामुळे भारतीय युजर्स 5जी स्मार्टफोनकडे वळू लागले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील सध्या नवीन आणि दमदार 5G स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर Realme चा शानदार 5G डिवाइस Realme Narzo 50 Pro 5G तुम्हाला खूप कमी किंमतीत विकत घेता येईल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर Realme चा हा स्मार्टफोन 8,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकला जात आहे.

Realme Narzo 50 Pro 5G Price आणि ऑफर्स

अ‍ॅमेझॉनवर realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनची मूळ किंमत 25,999 रुपये आहे. परंतु सध्या सुरु असलेल्या ऑफर अंतर्गत हा हँडसेट 31 टक्के म्हणजे 8,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकला जात आहे. त्यामुळे एवढा महागडा स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच या स्मार्टफोनवर 2,000 रुपयांचा कुपन डिस्काउंट देखील. हे देखील वाचा: एक सेटिंग बदलल्यास 4G SIM वर देखील मिळेल 5G सर्व्हिस; जाणून घ्या पद्धत

रियलमी Narzo 50 Pro 5G वरील बँक ऑफर पाहता आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. अ‍ॅक्सिस बँक आणि सिटीबँक क्रेडिट कार्डवर देखील 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर पाहता या Realme स्मार्टफोनवर 13,550 रुपयांचा मोठा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच स्मार्टफोनवर EMI आणि नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही हा स्मार्टफोन 6 आणि 3 माहीमच्या सुलभ हप्त्यांवर देखील विकत घेऊ शकता.

8000 Discount On Realme Narzo 50 Pro 5g Amazon Deal

Realme Narzo 50 Pro 5G Specifications

Realme Narzo 50 Pro 5G डिवाइसमध्ये 6.4 इंच FHD+ Amoled डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करोत. फोनमध्ये Mediatek Dimensity 920 5G प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. जोडीला 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 5000mAh ची मोठी बॅटरी 33W डार्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचा कॅमेरा पाहता डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात AI असलेली 48MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8MP सेकंडरी आणि 2MP अन्य लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा लेन्स आहे. हे देखील वाचा: संपता संपणार नाही या फोनची 6,000mAh ची बॅटरी; स्वस्तात 13GB RAM ची ताकद आणि 50MP Camera

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here