आता बदलेल मोबाईल फोटोग्राफीची दुनिया, Samsung ने आणला ISOCELL GN2 50MP इमेज सेंसर

Pic Credit : androidauthority

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने मोबाईल फोटोग्राफीची दुनिया बदलण्यासाठी एक नवीन इमेज सेंसर सादर केला आहे. आशा आहे कि हा सेंसर स्मार्टफोन फोटोग्राफीला एका नवीन स्थरावर घेऊन जाईल आणि युजरना आधीपेक्षा जास्त चांगल्या फोटोग्राफीचा अनुभव मिळेल. सॅमसंगने नवीन 50-मेगापिक्सल ISOCELL GN2 सेंसर मोठ्या 1.4-माइक्रोमीटर (माइक्रोन) आकाराच्या पिक्सलसह सादर केला आहे. हा सेंसर अनेक स्मार्टफोनवरील ISOCELL GN1 सेंसरपेक्षा चांगला आहे, आणि एका नवीन डुअल पिक्सेल प्रो टेक्नोलॉजीवर चालतो. (samsung isocell gn2 50 megapixel image sensor 1 4 um pixel official dualpro technology)

या नवीन सेंसरद्वारे युजर्सना चांगली इमेज क्वालिटी आणि अल्ट्रा हाई रिजोल्यूशन मिळेल. इतकेच नव्हे तर सॅमसंगच्या या सेंसरने युजर्स वर्टिकल आणि हॉरिजोंटली वेगवान आणि उत्तम ऑटो-फोक्स करू शकतील. तसेच डिटेलसाठी यात एचडीआर सपोर्ट पण आहे.

सॅमसंगनुसार नवीन एचडीआर फीचरच्या मदतीने एनर्जीच्या वापरात 24 टक्क्यांचीघट होईल. तसेच कंपनीने स्पष्ट केले आहे कि आईएसओसीएल जीएन 2 सेंसर सध्या मोठ्याप्रमाणावर प्रोडक्शन मध्ये आहे. पण अजूनतरी याच्या लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

हे देखील वाचा : अजून स्वस्त झाला बजेट कॅटेगरी मधील Redmi 9 Prime, जाणून घ्या नवीन किंमत

सॅमसंगच्या नवीन ISOCELL GN2 सेंसर मध्ये 50 मेगापिक्सलचा इमेज सेंसर आहे आणि लो लाइट मध्ये शानदार फोटोज क्लिक करण्यासाठी यात स्मार्ट आईएसओ प्रो आहे. 1 / 1.12-इंच ISOCELL GN2 सेंसर लो लाइट फोटोग्राफीसाठी चार पिक्सेल-बिनिंग टेक्नॉलॉजीसह 2.8-माइक्रोन पिक्सेलची मदत घेतो.

सेंसर 100-मेगापिक्सल रिजोल्यूशनमध्ये फोटोज क्लिक करण्याचा ऑप्शन पण देतो. सॅमसंग ISOCELL GN2 सेंसरवर डुअल पिक्सल प्रो टेक्नीक चांगल्यापद्धतीने आणि वेगाने ऑटो-फोकस करते. सॅमसंगचा दावा आहे कि हा कंपनीचा सर्वात शानदार फेस-डिटेक्शन ऑटो-फोकस आहे.

हे देखील वाचा : 24,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे Samsung सर्वात पावरफुल फोन Galaxy S21 Ultra 5G, जाणून घ्या कुठे मिळेल हा फोन

कॅमेरा सेंसर जरी सॅमसंगने तयार केला असला तरी कंपनी सर्वप्रथम हा आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये घेऊन येईल कि नाही याची माहिती कंपनीने दिली नाही. साउथ कोरियन टेक कंपनी सॅमसंगने याच्या लॉन्च डेटबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here