नवीन फोन घेताय? थांबा! जबरदस्त कॅमेऱ्यासह Oppo Reno8 आणि Reno8 Pro येतायत भारतात

OPPO Reno 8 सीरीज 18 जुलैला भारतात लाँच होणार आहे. सीरीज अंतगर्त Reno 8 आणि OPPO Reno 8 Pro भारतीयांच्या भेटीला येतील. हे दोन्ही हँडसेट आधीच चीनमध्ये लाँच झाले आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनबद्दल बरीचशी माहिती आधीपासूनच उपलब्ध आहेत. कंपनीनं मात्र Reno 8 सीरीजचे फोन्स MediaTek Dimensity प्रोसेसर, लिक्विड कूलिंग आणि जास्त मेमरीसह लाँच होतील अशी माहिती दिली आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला लाँचपूर्वीच OPPO Reno 8 आणि OPPO Reno 8 Pro च्या सर्व संभाव्य फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि प्राईसची माहिती देणार आहोत.

Oppo Reno 8 चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 8 स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात येईल. ओप्पोच्या या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 1300 प्रोसेसर दिला जाईल. आगामी Reno8 स्मार्टफोन 12GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB पर्यंतचा स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. हा अँड्रॉइड 12 आधारित ColorOS 12.1 वर चालेल. हे देखील वाचा: पारदर्शक बॅक पॅनल असलेल्या Nothing Phone (1) चे टॉप फीचर्स; आयफोनलाही लाजवेल अशी डिजाईन

अपकमिंग Oppo Reno 8 स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ओप्पोच्या या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP ची सेकंडरी लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. Oppo Reno 8 स्मार्टफोनची किंमत भारतात 29500 रुपयांपासून सुरु होऊ शकते.

OPPO Reno8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno8 Pro फोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाईल. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. कंपनी Gorilla Glass 5 ची सुरक्षा स्क्रीनला देईल. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसर देण्यात येईल. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल. हा फोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालेल.

OPPO Reno8 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो शूटर मिळेल. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा असेल. ओप्पोच्या या फोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी Marisilicon चिपसेट मिळेल. ओप्पोच्या आगामी फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल. हे देखील वाचा: जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा! पाहा 200MP सेन्सरचे कॅमेरा सॅम्पल; शाओमी-सॅमसंगच्या अडचणीत वाढ

OPPO Reno8 Pro ची किंमत

OPPO Reno8 Pro स्मार्टफोनचा हाय-अँड व्हेरिएंट 12GB रॅम व 256GB स्टोरेजसह भारतात 52,990 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. पहिल्यांदाच ओप्पोचा स्मार्टफोन 50 हजारांच्या सेग्मेंटमध्ये सादर केला जाईल. याआधी कंपनीनं इतका महाग कोणताही स्मार्टफोन सादर केलेला नाही. 12GB मॉडेलसह 8GB+128GB आणि 8GB+256GB ऑप्शन देखील भारतात येतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here