टेक कंपनी वीवो ने जून मध्ये अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपली ‘वाई सीरीज’ पुढे नेत वाय81 स्मार्टफोन लॉन्च केला होता. वीवो ने हा फोन मीड रेंज सेग्मेंट मध्ये सादर केला होता. आता वीवो आपला हा शानदार स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे. 91मोबाईल्सला माहिती मिळाली आहे की कंपनी येत्या आठवड्यात वीवो वाय81 स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात हा स्मार्टफोन जवळपास 14,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल तसेच आॅनलाईन शॉपिंग साइट सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.
वीवो वाय81 बद्दल कंपनी ने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही पण आमच्या टीम बातमी खबर मिळाली आहे की हा स्मार्टफोन पुढील आठवड्यात इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. वीवो वाय81 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे.
वीवो वाई81 मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ओपो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 sah सादर झाला आहे ज्या सोबत 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.
वाई81 ला वीवो ने अंर्तराष्ट्रीय मंचावर 3जीबी रॅम मेमरी सह सादर केला आहे. वीवो ने या फोन मध्ये 32जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.
वीवो वाय81 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो वाय81 भारतात जवळपास 14,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोनची लॉन्च डेट आणि याची निश्चित किंमत लवकरच तुम्हाला सांगण्यात येईल.