बजेट स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी itel नं भारतात नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन itel A23S नावानं दाखल झाला आहे. आयटेलचा हा फोन फीचर फोनवरून स्मार्टफोनवर अपग्रेड करणाऱ्या युजर्ससाठी योग्य ठरू शकतो, याची किंमत देखील बजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. itel A23S स्मार्टफोन 4G कनेक्टिव्हिटीसह येतो ज्यात 5 इंचाचा FWVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड फीचर देण्यात आलं आहे. पुढे आम्ही तुम्हाला आयटेलच्या लेटेस्ट एंट्री लेव्हल स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्ससह किंमतीची माहिती दिली आहे.
itel A23S चे स्पेसिफिकेशन्स
itel A23S स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा VGA डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 480×854 पिक्सल आहे. itel A23S स्मार्टफोनमध्ये 1.4GHz Quad Core (SC9832E) प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येतो. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो, जो 32GB पर्यंतच्या मेमरी कार्डला सपोर्ट करतो. आयटेलचा हा फोन Android 11 Go वर चालतो, जे अँड्रॉइड हलकं व्हर्जन आहे आणि या व्हर्जनला जास्त रॅम आणि मेमरीची आवश्यकता पडत नाही. यात गुगल अॅप्सचे लाईट व्हर्जन्स वापरता येतील. हे देखील वाचा: Google Pixel 6a मध्ये मोठा घोटाळा समोर; फिंगरप्रिंट रजिस्टर न करताच फोन होतोय अनलॉक
कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनच्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह 2MP चा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंटला मध्ये LED फ्लॅशसह VGA कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये फेस अनलॉक फीचर मिळतं. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 3020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
itel A23S स्मार्टफोन इंग्लिशसह मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ, तेलगु, पंजाबी, असमी, बंगाली, कन्नड, मल्याळम, कश्मीरी, उर्दू, नेपाळी आणि उडिया या 14 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Dual 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 4.2 सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये सोशल टर्बो फीचर मिळतं जे व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड, पीक मोड, कॉल अर्लट आणि स्टेटस सेव्ह सारख्या फिचर्ससह येतं. त्यामुळे तुम्ही WhatsApp वरील कॉल रेकॉर्ड करू शकता तसेच तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या लोकांचे स्टेटस सेव्ह करून ठेवू शकता. हे देखील वाचा: आता तुम्ही देखील करू शकाल अंतराळात प्रवास; अशी आहे ISRO ची जबरदस्त योजना
itel A23S ची किंमत
itel A23S स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत 5299 रुपये ठेवण्यात आली आहे. फिचर फोनवरून स्मार्टफोनवर अपग्रेड करणारे लोक याची निवड करू शकतात. आयटेलचा हा एंट्री लेव्हल स्वस्त स्मार्टफोन स्काय स्यान, स्काय ब्लॅक आणि ओसियन ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.















