भारतातील सर्वात नवीन आणि लोकप्रिय कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) सुरुवातीपासूनच आपल्या युजर्सना किफायतशीर प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स देत आहे. म्हणूनच ग्राहक जियोला जास्त पसंती देतात. तसेच 26 जुलैपासून सुरु असलेल्या 5G Spectrum च्या लिलावात भारतात सर्वप्रथम 5G आणण्यासाठी जियो आक्रमक बोली लावेल, असं विश्लेषकांना म्हणणं आहे. जियोच्या 5G प्लॅन्स महाग असतील की स्वस्त याबाबत अजूनही स्पष्ट उत्तर मिळालं नाही. परंतु या आर्टिकलमध्ये आपण Jio च्या सर्वात किफायतशीर 4G प्लॅनची माहिती घेणार आहोत. कंपनी कडे कॉलिंग आणि डेली डेटा बेनिफिट्स देणारा सर्वात स्वस्त प्लॅन 100 रुपयांपेक्षा देखील कमी किंमतीत उपलब्ध आहे. फक्त लक्षात असे दे की हा प्लॅन जियोफोन वापरणाऱ्या युजर्ससाठीच आहे, ज्याची माहिती आम्ही पुढे दिली आहे.
Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
हा रिलायन्स जियोचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे जो जियोफोन युजर्स वापरू शकतात. पुढे या प्लॅनची संपूर्ण माहिती वाचण्याआधी जाणून घ्या की भाववाढ होण्याआधी रिलायन्स जियोच्या 75 रुपयांचा प्लॅनमध्ये 28 दिवसांची वॅलिडिटी मिळत होती. तसेच प्लॅनमध्ये एकूण 3GB डेटा दिला जाता होता. आता या प्लॅनमध्ये नवीन कोणते बेनिफिट्स मिळतात ते जाणून घेऊया. हे देखील वाचा: 84 दिवसांची वैधता असलेला स्वस्त प्लॅन कोणाचा? अशी आहे Jio, Airtel, Vi आणि BSNL च्या पॅक्सची किंमत

जियोचा कॉलिंग आणि डेटा असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
- जियोच्या 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 23 दिवसांची वॅलिडिटी मिळते. प्लॅनमध्ये कोणत्याची नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो.
- तसेच या प्लॅनमध्ये रोज 100 MB डेटा आणि 23 दिवसांसाठी 200 MB अतिरिक्त डेटा देखील मिळतो. दोन्ही मिळून या प्लॅनमध्ये एकूण 2.5GB डेटा मिळतो.
- या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 50 SMS मोफत पाठवता येतात. तसेच युजर्सना या रिचार्जमध्ये जियो अॅप्सचे सब्सक्रिप्शन अगदी मोफत मिळेल.
किती वेगवान असेल Jio 5G?
रिलायन्स जियोच्या आधी सरकारी आकडे पहिले तर दूरसंचार मंत्रालायाने स्पष्ट केलं आहे की आगामी 5जी नेटवर्क जुन्या 4जी पेक्षा 10 पट जास्त वेगवान असेल. मंत्रालयानुसार 5G Network वर 20Gbps पर्यंतच्या डाउनलोड स्पीड मिळू शकेल. तसेच Reliance Jio द्वारे करण्यात आलेल्या 5जी ट्रायल्स पाहता Jio 5G वर 1Gbps स्पीड नेटवर्क टेस्टिंगमध्ये मिळाला आहे. वास्तवात रिलायन्स जियो नेटवर्कवर 420Mbps download speed तसेच 412Mbps upload speed मिळण्याची शक्यता आहे ज्यात 11ms latency म्हणजे फक्त 11 मायक्रोसेकंड्सची लेटेंसी असेल.
Jio 5G कधी होणार लाँच?
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेतेखाली यूनियन कॅबिनेटनं 5G Spectrum auction ला मंजुरी दिली आहे. दूरसंचार विभागाच्या प्रस्तवावर शिकामोर्तब करत केंद्र सरकारनं 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला हिरवा कंदील दाखवला आहे. हा लिलाव 26 जुलैला होणार असल्याची बातमी आली आहे. या लिलावात 5जी स्पेक्ट्रम पब्लिक आणि इंटरप्राइजेज दोन्हींना देण्यात येईल ज्यात Jio चं नाव अग्रस्थानी आहे.
हा लिलाव 20 वर्षासाठी असेल ज्यात Jio ला मिळणाऱ्या स्पेक्ट्रमवर कंपनी आपली 5G service सुरु करेल. स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यावर 15 ऑगस्टला भारत सरकार 5जी सेवा देशात सुरु करू शकतं आणि असे झाल्यास रिलायन्स जियोचे ग्राहक देशात सर्वप्रथम 5जी नेटवर्क असणारे मोबाईल युजर बनू शकतात, अशी चर्चा आहे. परंतु फोनमध्ये 5जी नेटवर्क येण्यास 2 ते 3 महिन्यांचा कालावधी अजून लागू शकतो.















