OPPO A98 टेना वेबसाइटवर लिस्ट; 12GB RAM, 108MP Camera आणि 67W Fast Charging चा खुलासा

काही दिवसांपूर्वी ओप्पो संबंधित एक मोठी बातमी आली होती की कंपनी आपल्या लोकप्रिय ‘ए’ सीरीज अंतर्गत नवीन OPPO A98 स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. विविध लिक्समधून ओप्पो ए98 की फोटोज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील समोर आली आहे. तसेच आता हा ओप्पो मोबाइल सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला आहे जिथे अनेक महत्वाच्या OPPO A98 Specifications चा खुलासा झाला आहे. लीकनुसार ओप्पो ए98 स्मार्टफोन 108MP Camera, 12GB RAM Qualcomm Snapdragon 695 चिपसेट आणि 67W Fast charging सारख्या फीचर्ससह बाजारात येऊ शकतो.

OPPO A98

ओप्पो ए98 स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स टेनावर PHQ110 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता टेनानुसार हा ओप्पो मोबाइल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो तसेच ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रोसेसरवर चालू शकतो. टेना वर OPPO A98 चे तीन व्हेरिएंट्स समोर आले आहेत ज्यात 6GB RAM, 8GB RAM आणि 12GB RAM दिला जाऊ शकतो. तसेच फोनचे 128GB, 256GB तसेच 512GB storage ऑप्शन टेनावर लिस्ट झाले आहेत. हे देखील वाचा: बजेटमध्ये एक नंबर डिस्प्ले असलेल्या Moto 5G फोनवर 4,000 रुपयांची सूट; स्टॉक संपण्याआधी करा बुक

लीकनुसार हा ओप्पो मोबाइल 6.7 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन कर्व्ड अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. आशा आहे की ओप्पो ए98 स्मार्टफोनची स्क्रीन पंच-होल स्टाइलसह येईल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. या ओप्पो मोबाइलचे डायमेंशन 162.3×74.3×7.7एमएम आणि वजन फक्त 171 ग्राम असल्याचं सांगण्यात आलं आहे.

OPPO A98 स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी देखील असल्याचा खुलासा टेनावर करण्यात आला आहे. सर्टिफिकेशन्स साइटनुसार हा ओप्पो स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करू शकतो. टेनावर कॅमेरा सेग्मेंटची कोणतीही माहित मिळाली नाही परंतु अन्य रिपोर्ट्स आणि लीक्सनुसार हा ओप्पो ए98 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: सर्वांच्या हातात असेल हा 5G फोन! फक्त 9,999 रुपयांमध्ये 50MP Camera आणि 7GB RAM सह लाँच

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here