32 हजारांचा फोन फक्त 8,249 रुपयांमध्ये! Xiaomi च्या सर्वात हलक्या 5G फोनवर जबरदास ऑफर

स्वस्त स्मार्टफोन घेण्याची योजना बनवत असाल तर या सीजनमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरु झाला आहे. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्म्सवर SmartPhone खूप स्वस्तात विकले जात आहे. यात शाओमीच्या सर्वात हलक्या 5G फोनचा अर्थात Xiaomi 11 Lite NE चा समावेश आहे, जो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. या हँडसेटवरील एक ऑफर युजर्सना फक्त 8,249 रुपयांमध्ये हा फोन विकत घेण्याची संधी देत आहे. फोनवर थेट डिस्काउंट, बँक ऑफर्ससह एक आकर्षक एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. गेल्यावर्षी बाजारात आलेल्या Xiaomi 11 Lite NE फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G 5G प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 6.55 इंच बडा डिस्प्ले आणि इतर अनेक शानदार फीचर्स मिळतात.

Xiaomi 11 Lite NE फोनवरील ऑफर्स

Amazon वर सध्या Xiaomi 11 Lite NE स्मार्टफोन 19 टक्के डिस्काउंटसह विकला जात आहे. त्यामुळे मूळ किंमत 31,999 रुपये असलेल्या हा फोन 19 टक्के डिस्काउंट म्हणजे 6,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 25,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच जर तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेण्यासाठी एखाद्या बँक कार्डचा वापर केला तर तुम्हाला 5000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट दिला जाईल. त्यामुळे या 5G स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये होईल. त्याचबरोबर SBI Credit Card आणि EMI ऑप्शनवर 10 टक्क्यांचा इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. हे देखील वाचा: सॅमसंग-रियलमी राहिले मागे! 200MP कॅमेरा आणि सर्वात पावरफुल प्रोसेसरसह येणार Redmi K50S Pro

एक्सचेंज ऑफर

जर तुम्हाला हा फोन फक्त 8,249 रुपयांमध्ये घरी घेऊन यायचा असेल तर तुम्हाला या फोनवरील एक्सचेंज ऑफरचा वापर करावा लागेल. या एक्सचेंज ऑफर अंतर्गत स्मार्टफोन विकत घेताना युजर्सना 17,250 रुपये पर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जुन्या डिवाइसची चांगली किंमत मिळाली तर नवीन Xiaomi 11 Lite NE फक्त 8,249 रुपयांमध्ये तुमचा होईल.

Xiaomi 11 Lite NE चे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 6.55-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, HDR 10+ आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G SoC 5G प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. सोबतीला 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. शाओमीचा हा फोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर चालतो. हे देखील वाचा: तुमचा Xiaomi फोन बनावट तर नाही ना? फसवणूक होण्याआधी अशी करून घ्या खात्री

Xiaomi 11 Lite NE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8MP ची अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा लेन्स आणि 5MP ची टेली मॅक्रो कॅमेरा लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनच्या सुरक्षेसाठी साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. तसेच ऑडियोसाठी यात ड्युअल स्पिकर मिळतात. फोनमध्ये 4250mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here