भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वाहन निर्माता कंपनी Mahindra and Mahindra नं आपल्या दोन ब्रँड्स अंतर्गत पाच इलेक्ट्रिक एसयूव्ही जगासमोरच्या ठेवल्या आहेत. या बॅटरी असलेल्या कार्स साल 2024 आणि 2026 दरम्यान लाँच केल्या जातील, ज्यात लोकप्रिय महिंद्रा XUV700 चं इलेक्ट्रिक व्हर्जनचा देखील समावेश आहे, जिला XUV.e8 नाव देण्यात आलं आहे. युनायटेड किंगडममध्ये आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटमध्ये XUV.e8, Mahindra XUV.e9, Mahindra BE.05, Mahindra BE.07 आणि Mahindra BE.09 या पाच कार्स प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. तसेच महिंद्राचे चेयरपर्सन आनंद महिंद्रानी स्पष्ट सांगितलं आहे की या कॉन्सेप्ट कार नाहीत आणि लोकांना तेच मिळेल जे दिसत आहे.
Electric Car मध्ये असेल खास टेक्नॉलॉजी
यात कॉपर ट्विन पीक लोगोसह XUV ब्रँड आणि ऑल-न्यू इलेक्ट्रिक-ओनली ब्रँड BE चा समावेश आहे. महिंद्राच्या या एसयूव्ही कार्समध्ये नवीन अत्याधुनिक INGLO EV टेक्नॉलजी मिळेल, जी फॉक्सवॅगनच्या MEB प्लॅटफॉर्म कंपोनेंटचा वापर करते. तसेच महिंद्रानं इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या भविष्यसाठी आपलं व्हिजन सादर केलं आहे.
And the curtain rises… pic.twitter.com/wRFQrejABu
— anand mahindra (@anandmahindra) August 15, 2022
Mahindra new EV SUVs
Mahindra XUV.e8 कंपनीच्या Mahindra XUV700 चं इलेक्ट्रिक व्हर्जन असेल आणि यात AWD इलेक्ट्रिक सेटअप असेल. ही डिसेंबर 2024 पर्यंत भारतीय रस्त्यांवर येईल. XUV.e9 पुढील ईव्ही असेल आणि कूप सारख्या डिजाइनसह येईल. XUV.e9 एप्रिल 2025 मध्ये पदार्पण करेल.
त्यानंतर पूर्णपणे न्यू बॉर्न इलेक्ट्रिक ईवीएस असेल. पहिली BE.05 असेल, जी एक स्पोर्टी SUV असेल आणि ऑक्टोबर 2025 मध्ये सुरु होईल. BE.07, एक थ्री-रोवाली फॅमली SUV, ऑक्टोबर 2026 मध्ये लाँच केली जाईल.
INGLO EV प्लॅटफॉर्म म्हणजे काय
INGLO EV प्लॅटफॉर्म म्हणजे सर्वात हलक्या स्केटबोर्ड आणि क्लास-लीडिंग उच्च ऊर्जा-घनत्व असलेल्या बॅटरी पैकी एक आहे. प्लॅटफॉर्म आधुनिक बॅटरी टेक्नॉलॉजी, प्लॅटफॉर्म आर्किटेक्चर, ब्रेन पावर आणि ह्यूमन मशीन इंटरफेसचा वापर करतो. भविष्यात महिंद्राची इलेक्ट्रिक वाहने INGLO प्लॅटफॉर्मवर बनली जातील.
5G सह येतील कार्स
त्याचबरोबर प्लॅटफॉर्म चांगल्या सेफ्टी स्टँडर्ड, रेंज आणि एफिशिएंसीनं सुसज्ज आहे. हा फ्यूचरिस्टिक, ऑग्मेंटेड रियल्टी-इनेबल्ड हेड-अप डिस्प्ले, एज-टू-एज स्क्रीन, 5G नेटवर्क क्षमता आणि ओव्हर-द-एयर अपडेटसह ड्राईव्हिंग एक्सपीरियंस सुधारतो.
किंमत
अजूनतरी कंपनीनं कोणत्याही कारच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, येत्या काळात लीक आणि रिपोर्ट्सच्या माध्यमातून Mahindra Electric Car ची प्राइस समोर येऊ शकते.