स्वातंत्र्य दिनाची भेट! Jio युजर्सना मिळत आहेत 3,000 रुपयांचे बेनिफिट्स मोफत, जाणून घ्या ऑफर

Jio नं आपल्या युजर्सना स्वातंत्र्य दिनाची भेट दिली आहे. कंपनीनं Jio Independence Offer 2022 सादर केली आहे जी 2,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये युजर्सना 3,000 चे बेनिफिट्स देत आहे. कंपनीनं या प्लॅनची माहिती आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून दिली आहे. आता ही ऑफर कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह झाली आहे. ही ऑफर कधीपर्यंत वैध असेल याची देखील माहिती देण्यात आलेली नाही. जियोच्या ट्विटर हँडलवरून एक पेस्टर शेयर करण्यात आला आहे ज्यात ही ऑफरची माहिती देण्यात आली आहे. याआधी देखील कंपनीनं फ्रीडम ऑफर अंतर्गत युजर्सना अनेक बेनिफिट्स दिले आहेत. परंतु यावेळी जियोद्वारे काही खास लाभ दिले जात आहेत.

Jio Independence Offer 2022

Jio Independence Offer 2022 चा हा प्लॅन 2,999 रुपयांचा आहे आणि यात कंपनी 365 दिवसांची वैधता देत आहे. तसेच या ऑफर अंतगर्त तुम्हाला रोज 2.5जीबी डेटा मिळतो. म्हणजे वर्षभरात 912.5 जीबी डेटा दिला जात आहे. सोबत अनलिमिटेड कॉलिंग, रोजचे 100 एसएमएस आणि रोमिंगसह अन्य बेनिफिट्स देखील दिले जात आहेत. हे देखील वाचा: कोणती टेलीकॉम कंपनी देणार किती 5G Internet Speed? जाणून घ्या Jio, Airtel आणि Vi चा 5जी प्लॅन

तसे Jio Independence Offer 2022 मध्ये खास बेनिफिट्स मिळतात. या ऑफर अंतर्गत कंपनीच्या अजियो स्टोरवरून खरेदी केल्यास 750 रुपयांची सूट, नेटमेड्सवरून खरेदी केल्यास 750 रुपयांची सूट आणि ऐक्सिगोवरून फ्लाइट किंवा टिकट बुकिंगवर 750 रुपयांची सूट दिली जात आहे. परंतु सर्वात खास बाब अशी म्हणता येईल की या ऑफर अंतगर्त कंपनी 75 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे जो 750 रुपयांच्या किंमतीचा आहे. एकूण 3,000 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट्स युजर्सना मिळत आहेत.

बेनिफिट्स पाहता हा एक आकर्षक प्लॅन आहे. वर सांगितलेल्या बेनिफिट्ससह या पॅक अंतगर्त कंपनी एक वर्षाचं डिज्नी प्लस हॉट स्टार मोबाइल सर्व्हिस फ्री देत आहे ज्याची किंमत 499 रुपये आहे. इतकेच नव्हे तर यात तुम्हाला Jio Cinema, Jio TV, Jio Security आणि Jio Cloud सारख्या सेवा देखील फ्री मिळत आहेत. ज्या मूव्ही आणि वेब सीरिजच्या चाहत्यांसाठी परफेक्ट ठरू शकतात. हे देखील वाचा: रोज 2GB डेटा देणारे Jio चे स्वस्त आणि बेस्ट प्लॅन्स; किंमत 249 रुपयांपासून सुरु

कधी सुरु होईल Jio 5G

लिलाव 20 वर्षांसाठी झाला आहे, ज्यात Jio नं मिळवलेल्या स्पेक्ट्रमवर कंपनी आपली 5G service सुरु करेल. चर्चा आहे की स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यावर 15 ऑगस्टला भारत सरकार 5जी सेवा देशात सुरु करू शकतं आणि असे झाल्यास रिलायन्स जियोचे ग्राहक देशात सर्वप्रथम 5जी नेटवर्क असलेले मोबाईल युजर बनू शकतात. परंतु फोनमध्ये 5जी नेटवर्क येण्यास 2-3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here