realme नं जवळपास महिन्यांपूर्वी आपल्या होम मार्केट चीनमध्ये realme Narzo 50i Prime स्मार्टफोन लाँच केला होता. रियलमी नारजो सीरीज भारतीय बाजारात देखील खूप लोकप्रिय आहे आणि या सीरीजचे लो बजेट मोबाइल फोन्स Redmi, OPPO, Vivo, Infinix आणि Tecno ला चांगली टक्कर देतात. ही स्पर्धा आणखी मजेदार करण्यासाठी रियलमी नारजो 50आय प्राइम आता भारतात आहे. हा मोबाइल फोन कंपनीनं टीज केला आहे आणि लिहलं आहे की realme narzo 50i Prime Coming soon in India म्हणजे रियलमी नारजो 50आय प्राइम भारतात लाँच होणार आहे.
realme narzo 50i Prime India Launch
रियलमी इंडियानं आपल्या अधिकृत वेबसाइटवर नारजो 50आय प्राइम टीज केला आहे. फोनचं प्रोडक्ट पेज कंपनी वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अॅमेझॉनवर पण लाइव्ह करण्यात आलं आहे ज्यावरून स्पष्ट झालं आहे की realme narzo 50i Prime ची विक्री Amazon च्या माध्यमातून होईल. कंपनीनं शेयर केलेल्या फोटोमध्ये फोनचा लुक चीनमध्ये लाँच झालेल्या नारजो 50आय प्राइम सारखा दिसत आहे त्यामुळे हा मोबाइल चिनी स्पेसिफिकेशन्ससह येईल हे निश्चित झालं आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये realme narzo 50i Prime भारतात लाँच होईल कारण अजूनतरी याची ठराविक लाँच डेट समोर आली नाही. हे देखील वाचा: जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती
Class and elegance are just around the corner!
Get ready to turn heads with the #realmeNarzo50iPrime and its Stage Light Design. Feel like the star no matter where you are ⭐
Coming Soon.
Know more: https://t.co/oOAcEJYx2u pic.twitter.com/uDdZ5XhVVZ
— realme (@realmeIndia) September 7, 2022
Realme Narzo 50i Prime Price
रियलमी नारजो 50आय प्राइम चीनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता. फोनचा बेस व्हेरिएंट 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत भारतीय करंसीनुसार 7,850 रुपयांच्या आसपास आहे. तर तरह Realme Narzo 50i Prime 4GB RAM + 64GB Storage व्हेरिएंट इंडियन करंसीनुसार जवळपास 8,600 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. आशा आहे की Realme Narzo 50i Prime ची भारतीय किंमत देखील याच रेंजमध्ये असेल. तसे झाल्यास हा या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरू शकतो.
Realme Narzo 50i Prime Specifications
हा मोबाइल फोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. वॉटरड्रॉप नॉच स्टाइल असलेली ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे. या फोनची जाडी फक्त 8.55एमएम आहे तर वजन 182 ग्राम आहे. या सेग्मेंटमधील सर्वात पातळ आणि हलक्या स्मार्टफोन्स पैकी हा एक असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. इस रियलमी फोनमध्ये ड्युअल सिम, 4जी आणि 3.5एमएम जॅकसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.
Realme Narzo 50i Prime अँड्रॉइड 11 ओएसच्या ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे. चीनी मार्केटमध्ये हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 141 रुपयांमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी! यापेक्षा स्वस्तात मिळणार नाही वर्षभराची वैधता
फोटोग्राफीसाठी Realme Narzo 50i Prime मध्ये एफ/2.0 अर्पचर असलेला 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 4एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या रियलमी मोबाइलमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएच ची बॅटरी आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. रिपोर्टनुसार हा फोन सिंगल चार्जमध्ये 36 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो.
















