Samsung Galaxy A32 Price Cut: Samsung नं गेल्यावर्षी Galaxy A-सीरीजमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए32 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला होता, जायच्या किंमतीत आता कपात करण्यात आली आहे. या डिवाइसचा 6GB RAM व्हेरिएंट 21,999 रुपये आणि 8GB RAM व्हेरिएंट 23,499 रुपयांमध्ये भारतात आला होता. आता या mid-range 4G phone च्या दोन्ही व्हेरिएंटच्या प्राइसेस Samsung नं कमी केल्या आहेत. चला जाणून घेऊया या फोनची नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
Galaxy A32 ची नवीन किंमत
Galaxy A32 स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB व्हेरिएंटच्या किंमतीत 3,499 रुपयांची कपात करण्यात आली आहे, त्यामुळे हा मॉडेल आता 18,500 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Galaxy A32 स्मार्टफोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल आता 18,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल, ज्याच्या किंमतीत 4,750 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या डिवाइसचे दोन्ही व्हेरिएंट ई-कॉमर्स साइट Amazon वरून विकत घेता येतील. तसेच फोन Awesome Black, Awesome Blue आणि Awesome Violet तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे देखील वाचा: 20 हजारांच्या बजेटमध्ये नवीन Samsung 5G Smartphone ची एंट्री; जाणून घ्या या फोनचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A32 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा FHD+ sAMOLED Infinity-U डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. त्याचबरोबर हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह येतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन MediaTek Helio G80 SoC सह Mali-G52 2EEMC2 GPU सह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला दणका देण्यासाठी अत्यंत कमी किंमतीत Samsung Galaxy A04s ची एंट्री
कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. तसेच सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 15W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.














