सॅमसंगसंबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे की कंपनी आपल्या ‘एफ’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते जो Samsung Galaxy F04s नावानं लाँच होऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एफ04एस एक लो बजेट स्मार्टफोन असू शकतो जो स्वस्तात बाजारात उपलब्ध होऊ शकतो. कंपनीनं आतापर्यंत आपल्या या नवीन गॅलेक्सी मोबाइलबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु ताज्या लीकमध्ये Samsung Galaxy F04s स्मार्टफोन संबंधित महत्वाची माहिती व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
Samsung Galaxy F04s
सॅमसंग गॅलेक्सी एफ04एस स्मार्टफोन वाय-फाय अलायंस (Wi-Fi alliance) वर स्पॉट झाला आहे जो सर्वप्रथम टेक वेबसाइट प्राइसबाबानं बघितला आहे. या वायफाय सर्टिफिकेशन्स साइटवर नवीन सॅमसंग स्मार्टफोन SM-E045F/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमध्ये समोर आले आहे की Samsung Galaxy F04s स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर लाँच होऊ शकतो ज्यात 2.4गीगाहर्ट्ज सिंगल बँड वायफायचा सपोर्ट मिळू शकतो. फोनची इतर माहिती समोर आली नाही, परंतु आशा आहे आहे की कंपनी लवकरच गॅलेक्सी एफ04एस बाजारात घेऊन येऊ शकते. हे देखील वाचा: Jio 5G Plans: जियोचा 5G वापरण्यासाठी कोणता प्लॅन आहे बेस्ट, पाहा यादी
फिनलंडमधील Samsung Galaxy A04s चे स्पेसिफिकेशन्स
अलीकडेच फिनलँडमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए04एस स्मार्टफोन लाँच झाला आहे. ज्यात 20:9 अॅस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन पीएलएस एलसीडी पॅनलवर बनली आहे, जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.
Samsung Galaxy A04s अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय कोर 4.1 वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा फोन 4 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी ए04एस ड्युअल सिम फोन आहे जो 4एलटीई वर चालतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी ची देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 15,000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा 5G फोन; बजेटमध्ये 8GB रॅम आणि 64MP चा शानदार कॅमेरा
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A04s च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढ्याच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
















