8GB रॅम असलेल्या Samsung Galaxy M52 5G च्या एमआरपीवर 15,000 रुपयांचा डिस्काउंट, जाणून घ्या माहिती

भारतात सुपर फास्ट 5G नेटवर्क लाइव्ह झाल्यामुळे स्मार्टफोन युजर्स आता 5G स्मार्टफोनकडे वळू लागले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील नवीन 5G स्मार्टफोनवर स्विच करण्याचा विचार करत असाल तर Samsung चा Galaxy M52 5G फोन एक चांगलं पर्याय ठरू शकतो. कारण यावर कंपनी 15,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सॅमसंगचा हा 5G डिवाइस डिस्काउंट, बँक ऑफर आणि तसेच एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये खूप दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच फोनला भारतीय युजर्सनी चांगली रेटिंग देखील दिली आहे. चला जाणून घेऊया या फोनवर मिळणाऱ्या सर्व ऑफर आणि किंमतची संपूर्ण माहिती.

Samsung Galaxy M52 5G ची किंमत आणि ऑफर

Amazon प्लॅटफॉर्मवर Samsung Galaxy M52 5G ची एमआरपी 36,999 रुपये आहे. परंतु सध्या कंपनी 41 टक्के म्हणजे 15,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंट नंतर तुम्ही हा फोन फक्त 21,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. ही किंमत स्मार्टफोनच्या 8GB रॅम +128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. हे देखील वाचा: 12 महीने चालणारा BSNL चा रिचार्ज, भरपूर डेटा आणि फ्री कॉलिंग

बँक ऑफर पाहता स्मार्टफोनवर फेडरल बँक कार्डच्या मदतीनं 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन विकून नवीन 5G डिवाइस घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला Samsung Galaxy M52 5G डिवाइसवर 14,050 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल. या स्मार्टफोनवर कंपनी नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील देत आहे, म्हणजे एकूण तुम्हाला सॅमसंगचा हा डिवाइस खूप स्वस्तात मिळेल.

Samsung Galaxy M52 5G Specifications

फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन आणि डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळतं. प्रोसेसर बद्दल बोलायचं तर, यात Qualcomm SDM 778G Octa Core 2.4GHz चिपसेटचा वापर केला गेला आहे. Galaxy M52 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित OneUI वर चालतो. जोडीला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: अजून एक जबरदस्त दाक्षिणात्य चित्रपट येतोय OTT वर; Nagarjuna च्या ‘द घोस्ट’ ची रिलीज डेट समजली

सॅमसंग गॅलेक्सी एम52 5जी डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP ची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळतो. बॅटरीच्या बाबतीत फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here