MS Dhoni नं खरेदी केली Kia EV6 इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार Mahendra Singh Dhoni नं आपल्या कार्सच्या यादीत एका नवीन कारचा समावेश केला आहे. धोनीचं कार प्रेम जगजाहीर आहे परंतु पहिल्यांदाच त्याने एक इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. महेंद्र सिंग धोनीनं आपल्या कार्सच्या ताफ्यात Kia EV6 electric crossover चा समावेश केला आहे. एमएस धोनीकडे आधीपासूनच अनेक दुसऱ्या कार आहेत, ज्यात जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक, हमर एच2, निसान जोंगा आणि ऑडी क्यू7 सारख्या एसयूव्हीचा समावेश आहे. तसेच त्याच्याकडे पोर्श 911 आणि फरारी 599 GTO सारख्या काही स्पोर्ट्स कार्स देखील आहेत. आता यात इलेक्ट्रिक कार Kia EV6 चा समावेश झाला आहे जिचे फीचर्स आणि किंमत आपण या लेखात पाहणार आहोत.

Kia EV6 ची किंमत

Kia EV6 भारतात थेट दक्षिण कोरियावरून आयात केली जाते. या कारचे दोन व्हेरिएंट भारतात विकले जातात. थेट आयात केली जात असल्यामुळे या कारची किंमत देखील तेवढीच जास्त आहे. प्राइस पाहता Kia EV6 च्या GT Line RWD व्हेरिएंटची किंमत 59.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे तर GT Line AWD व्हेरिएंटची किंमत 64.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे देखील वाचा: 12 हजारांच्या बजेटमध्ये दमदार 5G Phone; 6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह येतोय Infinix Hot 20 5G

Kia EV6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

केबिनमध्ये Kia EV6 ड्युअल-स्क्रीन लेआउट देते, एक इंस्ट्रूमेंट पॅनलसाठी आणि दुसरा इंफोटेनमेंट स्क्रीनसाठी. यात कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, augmented reality हेड-अप डिस्प्ले, ADAS सुरक्षा सुविधा आणि एक नवीन दोन -स्पोक स्टीयरिंग व्हील मिळते.

या Kia इलेक्ट्रिक कारमध्ये 77 KWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो सिंगल चार्जमध्ये सुमारे 528 किलोमीटरची रेंज देतो. तसेच Kia EV6 इलेक्ट्रिक कार फक्त 5.2 सेकंदात 0 ते 100 km/h चा वेग गाठू शकते. या कारला पावर देण्यासाठी सोबत एक 350KWh चा चार्जर देखील कंपनी देते. हे देखील वाचा: 9 हजारांच्या बजेटमध्ये स्वदेशी कंपनीचा शानदार स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह Lava Blaze NXT लाँच

Kia EV6 GT व्हेरिएंट जो 229HP पावरसह 350Nm टॉर्क प्रोड्यूस करतो. तर Kia EV6 GT-Line इलेक्ट्रिक व्हेईकल व्हेरिएंट 347 HP पावरसह 605 Nm टॉर्क निर्माण करतो. खास फीचर्स अंतर्गत Kia च्या या इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये पॅनोरॉमिक सनरूफ, मल्टीपल ड्राईव्ह मोड, फॉरवर्ड कॉलिजन अवॉइड असिस्ट, लेन कीप असिस्ट आणि 60 कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here