ऑटो एक्सपो 2023 मधून दिसू शकते MG 4 EV ची पहिली झलक; अजून एक ईव्ही होऊ शकते प्रदर्शित

MG Motor India आपली एक नवीन इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे. रिपोर्ट्सनुसार, आगामी ई-कार MG 4 EV hatchback असेल जी मोठी रेंज आणि शानदार फीचर्ससह धमाकेदार एंट्री करू शकते. आता लेटेस्ट रिपोर्ट्समधून समोर आलं आहे की 13 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या Auto Expo 2023 मध्ये MG 4 EV hatchback प्रदर्शित (MG 4 EV hatchback to be showcased at the Auto Expo 2023) केली जाईल. तसेच आशा आहे की या ऑटो इव्हेंटमध्ये कंपनीच्या upcoming MG Air City EV ची झलक मिळेल, तसेच ही ई-कार इंडियन ईव्ही मार्केटमध्ये सादर केली जाईल.

MG 4 EV सह दिसतील या ई-कार

Autocar India च्या रिपोर्टमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की MG 4 EV Auto Expo 2023 दरम्यान दाखवली जाऊ शकते. तसेच रिपोर्टनुसार या ऑटो इव्हेंटमध्ये कंपनीच्या MG 4 EV hatchback सह आगामी MG Air City EV आणि रिफ्रेश MG Hector SUV देखील दिसू शकतात. काही महिन्यांनी या कार्स देखील भारतीयांच्या सेवेत दाखल होतील अशी अपेक्षा आहे. हे देखील वाचा: बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय स्वदेशी LAVA X3; दमदार फीचर्ससह किंमत 7 हजारांच्या बजेटमध्ये

MG 4 EV चे फीचर्स

MG 4 EV याआधी European market मध्ये लाँच झाली आहे जी तिथे Volkswagen ID.3 आणि Kia Niro ला टक्कर देत आहे. MG 4 EV बद्दल बोलायचं झालं तर या कारची लांबी 4,287mm आहे. तसेच MG 4 EV हॅचबॅक SAIC च्या मॉड्यूलर स्केलेबल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

तसेच MG 4 EV मध्ये दोन बॅटरीपॅक ऑप्शन 51kWh आणि 64kWh सह बाजारात आली आहे. छोटा बॅटरी पॅक जवळपास 170bhp ची पावर देतो तर मोठा 203bhp रेटेड पावर आउटपुट देतो. EV सिंगल-मोटर रियर-व्हील ड्राईव्ह सेटअपसह बाजारात आली आहे. सेटअप 150kW पर्यंतच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो आणि 7kW चार्जरसह येतो. मोठ्या बॅटरी पॅकसह MG EV 4 सिंगल चार्जवर 452km पर्यंतचा प्रवास करू शकते. हे देखील वाचा: VI च्या ग्राहकांसाठी अच्छे दिन; कंपनी मोफत देतेय अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग

MG EV 4 मध्ये 10.25 इंचाचा सेंट्रल इंफोटेनमेंट डिस्प्ले, 7 इंचाचा एमआयडी, रोटरी गियर सेलेक्टर, वायरलेस चार्जिंग पॅड, 360 डिग्री कॅमेरा, हवेशीर फ्रंट सीट आणि एडीएएस सूट मिळण्याची शक्यता आहे. तसेच बाहेरील बाजूस एमजी 4 ईव्हीमध्ये एलईडी लाइटिंग, मोठे ड्युअल-टोन अलॉय व्हील, एक स्पोर्टी रूफलाइन आणि एसयूव्ही प्रेमींना आकर्षित करण्यासाठी बॉडी क्लॅडिंग मिळेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here