Tecno Phantom X2 5G च्या भारतीय किंमतीची माहिती झाली लीक

टेक्नोनं काही दिवसांपूर्वी टेक मंचावर शक्तिप्रदर्शन करत ‘फँटम एक्स2’ सीरीज सादर केली होती. या सीरीज अंतगर्त Phantom X2 आणि Phantom X2 Pro हे दोन 5G Phone जागतिक बाजारात लाँच करण्यात आले आहेत. यातील प्रो मॉडेलमध्ये पॉप आऊट झूम लेन्स देण्यात आली आहे, जी सध्या इतर कोणत्या स्मार्टफोन कॅमेऱ्यात मिळत नाही. नवीन वर्ष 2023 मध्ये हे दोन्ही टेक्नो फोन भारतीय बाजारात एंट्री करू शकतात. कंपनीनं सध्या इंडिया लाँच डेटचा खुलासा तर केला आहे परंतु एका लीकमध्ये या मोबाइल फोनच्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला आहे.

Tecno Phantom X2 ची भारतातील किंमत

टिपस्टर पारस गुगलानीनं टेक्नो फँटम एक्स2 5जी फोनच्या इंडिया प्राइसची माहिती दिली आहे. लीकनुसार हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 26,999 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही फोनच्या 8GB RAM + 256GB storage व्हेरिएंटची किंमत असू शकते. फोनची जागतिक बाजारातील किंमत पाहता अशी चर्चा आहे की ही किंमत लाँच ऑफर अंतर्गत मिळू शकते, मूळ किंमत यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: पुणेकरांना मिळणार मोफत 5G ची मजा; निवडक ठिकाणी Airtel 5G Plus उपलब्ध, पाहा यादी

Tecno Phantom X2 सीरीजच्या ग्लोबल मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स

Tecno Phantom X2 सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ Curved Display देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग आणि Corning Gorilla Glass Victus Protection ला सपोर्ट करतो. दोन्ही फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 9000 5G प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Mali-G710 MC10 GPU देण्यात आला आहे. हे स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित HiOS 12.0 वर चालतात.

Tecno Phantom X2 आणि X2 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करते आहेत. बेस मॉडेलमध्ये प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन (OIS) सपोर्टसह येतो. जोडीला 13MP ची सेकंडरी लेन्स आणि 2MP ची लेन्स मिळते. तर प्रो मॉडेलमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 50MP ची पोर्टेट लेन्स आणि 13MP चा कॅमेरा आहे. टेक्नोच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: फक्त 499 रुपयांमध्ये करा बुक; 115Km च्या जबरदस्त रेंजसह आली BGAUSS BG D15 इलेक्ट्रिक स्कूटर

Tecno Phantom X2 स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB UFS 3. स्टोरेज देण्यात आली आहे. तर X2 Pro स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो. तसेच Vapor Chamber Cooling System आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. पावर बॅकअपसाठी यात 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,160एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here